Join us  

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एका वकिलाच्या संपर्कात होता सुशांत, सीबीआयच्या हाती नवे धागे-दोरे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 12:35 PM

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केली होती. या दोघांच्या केसमध्ये काही संबंध आहे का? या दृष्टीनेही तपास करण्यात येतोय.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सीबीआय वेगवेगळ्या अ‍ॅंगलने तपास करत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केली होती. या दोघांच्या केसमध्ये काही संबंध आहे का? या दृष्टीनेही तपास करण्यात येतोय. पण दोघांच्याही आत्महत्येमागे काय कारण असू शकतं हे अजूनही समोर आलेलं नाही. १४ जून २०२० ला सुशांतच्या मृत्यूआधी एक आठवड्या पूर्वी ८ जूनला दिशाचं निधन झालं होतं.

ताज्या रिपोर्ट्सनुसार, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिशाच्या निधनानंतर एका वकिलाच्या संपर्कात होता. सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीने त्याच दिवशी सुशांतचं घर सोडलं होतं, ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला होता. यानंतर लगेच सुशांतने एका वकिलाला संपर्क केला होता. पण यामागचं कारण समजू शकलं नाही. याआधी मुंबई पोलिसांनी कथितपणे सांगितले होते की, आत्महत्येपूर्वी सुशांतने अनेक गोष्टींबाबत गुगलवर सर्च केलं होतं. ज्यात त्याच्या आजाराबाबतच्या माहितीचाही समावेश होता.

सुशांतने गुगलवर दिशा सालियनचा उल्लेख असलेल्या बातम्या सर्च केल्या होत्या. कथितपणे सुशांत सिंह राजपूतने सिद्धार्थ पिठानीच्या मदतीने त्या हार्ड डिस्क डिलीट केल्या होत्या, ज्यात दिशा सालियनचा उल्लेख होता. सिद्धार्थ पिठानीने स्वत: ही बाब सीबीआयसमोर मान्य केलीय.

याआधी मुंबई पोलीस आयुक्तांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने एका वकिलासोबत व्हॉट्सअॅप टेक्स्टच्या माध्यमातून संवाद साधला. ज्यात त्याने दिशा सालियनसोबत ओळख आणि तिच्याशी संबंधित असण्याबाबत विचारले होते. सीबीआय कथितपणे दोन्ही केसचा काही संबंध आहे का याचा तपास करेल.

दरम्यान, सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का ? याची चौकशी आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी करायला सुरुवात केली आहे. त्याचा तपास सुरू झाला असून गुरुवारी दिशाची कंपनी कॉर्नरस्टोनचे संचालक अर्जुन सजदेह यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले, अशी माहिती नवभारत टाईम्सने दिली आहे. 

श्रुती सुट्टीवर गेली, दिशा आली

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास कॉर्नरस्टोनचे संचालक अर्जुन सजदेह डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. दिशा सालियनबरोबर श्रुती मोदी देखील या कंपनीत काम करत होती. या कंपनीने सुशांतचे प्रोफाइल व्यवस्थापित केले. श्रुती मोदी काही दिवस सुट्टीवर गेली होती, जेव्हा दिशा सालियन हिची कंपनीने सुशांतसाठी नियुक्त केले होते. 

८ जून रोजी दिशाचा मृत्यू, रिया त्याच दिवशी घराबाहेर पडली

दिशा सालियन हिचे ८ जून रोजी मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्यानंतर निधन झाले. रिया चक्रवर्ती त्याच दिवशी सुशांतचे घर सोडली. त्यानंतर 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची बातमी आली. दिशाच्या मृत्यूमुळे सुशांत खूप नाराज असल्याचे समोर आले आहे. दिशाच्या मृत्यूने काळजीत असलेल्या सुशांतचे नाव दिशाशी देखील जोडले जात होते.

हे पण वाचा :

सुशांतच्या अकाउंटमधून झाली होती का 15 कोटींची हेराफेरी? या दाव्यामुळे उपस्थित झाले प्रश्न

रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला ड्र्ग्सचा हाय डोज द्यायची, सुशांतच्या मित्राने केला खुलासा!

नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूडगुन्हा अन्वेषण विभाग