Join us  

मोठा खुलासा..! 5 महिन्यानंतर लग्नबेडीत अडकणार होता सुशांत सिंग राजपूत, कोण होती वधू?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:21 PM

यावर्षी सुशांत सिंग राजपूत लग्न करणार होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर बॉलिवूडमधील कलाकारांना धक्का बसला आहे. कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे. यादरम्यान सुशांत सिंग राजपूतच्या चुलत भावाने सांगितले की, यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुशांत लग्न करणार होता. इतकेच नाही तर कुटुंबातील त्याच्या लग्नाच्या तयारीलादेखील लागले होते.सुशांत सिंग राजपूतच्या चुलत भावाने इंडिया टीव्हीला सांगितले की, 'नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. आम्ही कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला देखील येणार होतो.'

सुशांतचं लग्न कोणासोबत होणार होते हे मात्र सुशांतच्या भावाने सांगितले नाही. सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. त्याचा परिवार बिहारमधल्या पाटनामध्ये राहत आहे. सुशात सिंग राजपूतने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अकाली जाण्याने बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करत सुशांतने फार कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती