Join us

सुशांत सिंग राजपूत डिप्रेशनमध्ये होता?, गर्लफ्रेंड रिया चक्रवतीची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:59 IST

गेल्या काही दिवसांपासून रिया सुशांतसोबत राहत होती मात्र काही दिवसांपूर्वी सुशांतने तिला घरी पाठवले होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.  न्यूज 18च्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनमध्ये सुशांत सिंग राजपूत गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत राहत होती. रिपोर्टनुसार मुंबई पोलिस लवकरच रिया चक्रवर्तीचा जबाबसुद्धा नोंदवणार आहे. 

अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यावर सुशांत रियासोबत रिलेशनशीपमध्ये होता. गेल्या काही दिवसांपासून रिया सुशांतसोबत राहत होती मात्र काही दिवसांपूर्वी सुशांतने तिला घरी पाठवले होते. आता पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की या दोघांचे संबंध कसे होते?, मृत्यूआधी रिया आणि सुशांत यांच्यात वाद झाला होता का?, अभिनेता नैराश्यात का होता?

मुंबई पोलिसांनाही हे जाणून घ्यायचे आहे की जर या दोघांमधील संबंध बिघडले होते तर त्यामागचे कारण काय होते. रियाने घर का सोडले? सुशांतशिवाय रियाचे बाकीच्या कुटूंबाशी काही मतभेद होते का? या प्रश्नांची उत्तरे रिया चक्रवर्तीच्या जबाबानंतर मिळू शकतात. 

मागील काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती एकमेकांच्या खूप जवळ आले होते. बऱ्याच वेळेला ते दोघे एकत्र व्हेकेशन एन्जॉय करतानाही दिसले होते. त्यामुळे ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचीही चर्चा रंगली होती. आता सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त समोर आल्यानंतर असं सांगितलं जात आहे की रिया व सुशांतच्या नात्यात कटुता आली होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती