Join us  

- म्हणून सीबीआय चौकशीच्या मागणीवर गप्प होते सुशांतचे कुटुंब, बहिणीनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:52 AM

सुशांतच्या कुटुंबीयांपैकी कोणीही एकदाही सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरली नव्हती. असे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता.

ठळक मुद्देसुशांतच्या मृत्यूप्रकरणी एकीकडे सीबीआय चौकशीची मागणी होत असताना दुसरीकडे सुशांतचे वडील कृष्णा सिंह यांनी पाटणा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहेत. सुशांतची कथित गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात पाटण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यापूर्वी सुशांतने बॉलिवूडच्या घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप अनेकांनी लावून धरला होता. इतकेच नाही तर याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही केली होती. विशेष म्हणजे, या काळात सुशांतच्या कुटुंबीयांपैकी कोणीही एकदाही सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरली नव्हती. असे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता त्याचा खुलासा झाला आहे.

  सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्ती हिने याबद्दलचा खुलासा केला आहे. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना किर्तीने यामागचे नेमके कारण सांगितले. ‘सुशांत कुटुंबीय सीबीआय चौकशीच्या मागणीवर गप्प का?’ असा सवाल सुशांतच्या एका चाहत्याने श्वेताला विचारला होता.

या चाहत्याला श्वेताने उत्तर दिलेय. ‘ आम्ही मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होण्याची आणि रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहोत,’, असे तिने यावर म्हटले आहे. 

 

प्रकरणाला वेगळी कलाटणीसुशांतच्या मृत्यूप्रकरणी एकीकडे सीबीआय चौकशीची मागणी होत असताना दुसरीकडे सुशांतचे वडील कृष्णा सिंह यांनी पाटणा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. त्यामध्ये त्यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती  आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. रिया सुशांतला ब्लॅकमेल करत होती. त्याला मनोरूग्ण ठरवण्याची धमकी देत होती, असे अनेक आरोप त्यांनी आपल्या एफआयआरमध्ये केले आहेत.  सुशांतच्या बँक खात्यातून 17 कोटी गेल्या वर्षभरात काढले गले आणि यातील 15 कोटी अशा खात्यात ट्रान्सफर झाले आहेत की ज्याच्याशी सुशांतचा काहीही संबध नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याच्या या आरोपामुळे या प्रकरणाला अचानक वेगळी कलाटणी मिळाली आहे. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत