Join us  

धक्कादायक! सुशांतची बहीण श्वेताकडून ड्रग ग्रुपचं चॅटींग लीक, रियाचा मेसेज - 'डूबी'ची गरज आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 11:23 AM

श्वेताने शेअर केलेले स्क्रीनशॉट्स गेल्या ३० जुलैमधील आहेत. यात रिया काहीतरी डूबी ऑर्डर करताना दिसत आहे. तिने लिहिले की, डूबीची गरज आहे.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग चॅटींग फारच चर्चेत आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने काही नवीन चॅटींगचे स्क्रीनशॉट्स ट्विटरवर शेअर केले आहेत. या चॅटींगमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती doobie ऑर्डर करत आहेत. गूगल सर्चनुसार ही एक गांजाची सिगारेट असते.

श्वेताने शेअर केलेले स्क्रीनशॉट्स गेल्या ३० जुलैमधील आहेत. यात रिया काहीतरी डूबी ऑर्डर करताना दिसत आहे. तिने लिहिले की, डूबीची गरज आहे. यावर उत्तर आलं की, घेऊन येत आहे. यावर आयुषचा मेसेज आहे की, रोल करत आहे. यादरम्यान सिद्धार्थ पिठानीचा मेसेज येतो की मिरांडा आला आहे. 

सुशांतसोबत काम करणाऱ्यांचा ग्रुप

 

श्वेताने जे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत NIFW नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधी आहेत. या ग्रुपमधे आयुष, आनंदी, सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडासहीत रिया आणि इतरही काही नावे आहेत. या चॅटमधील जास्तीत जास्त लोकांची ओळख त्यांच्या नावांवरूनच होत आहे. पण हे चॅटींग कुणाच्या मोबाईलमधील आहे हे समजू शकलेलं नाही.

सिद्धार्थ पिठानीचा मेसेज

 

या चॅटींगमध्ये मोबाइल ओनरचं उत्तर येतं की वॉटरस्टोनचं बुकिंह कॅन्सल झालं आहे. तसेच या चॅटींगमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. जसे की, आपल्याकडे डूब आहे का? SSR ला डूब मिळालं आहे ना?

रियाच्या भावाने लिहिलं - स्पीकरही घेऊन या...

 

या ग्रुपमध्ये रियाचा भाऊ शोविकचं चॅटींगही आहे. त्याने मेसेज केलाय की, लवकर पोहोचा. आयुषला सांगा की डूबीज घेऊन ये. सोबतच लिहिले आहे की, स्पीकर्सही घेऊन ये.

रियाने चॅटींगबाबत मान्य केलं

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियाने हे मान्य केलंय की, लीक झालेली चॅटींग तिचीच आहे. सुशांतची बहीण श्वेताने सॅम्युअल मिरांडा, रिया, सिद्धार्थ, शोविक, आनंदीसहीत अनेक लोकांमध्ये झालेल्या चॅटींगचे स्क्रीनशॉट्स आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत.

श्वेता सिंहचे ट्विट्स

रियाला ही चूक पडू शकते महागात...

श्वेता सिंग किर्तीने रिया चक्रवर्तीने खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतील एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात रिया सांगतेय की, खारमध्ये माझी एक प्रॉपर्टी आहे, जी मी सुशांतला भेटण्याआधी विकत घेण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्याची किंमत 72 लाख रुपये आहे. या घरासाठी मी 50 लाखाचे लोन घेतले आहे. सर्व पेपर मी ईडीला दिले आहेत. या घराचे लोन अद्याप मी भरते आहे. मला 50 लाख रुपये द्यायचे आहेत. 17 हजार माझा महिन्यांचा ईएमआय आहे. आता माहित नाही मी कशी भरणार?

 

आता श्वेता सिंग किर्तीने रिया चक्रवर्तीच्या या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. तिने ट्विट केले की, तुम्ही या गोष्टीमुळे चिंतेत आहात की 17 हजारचा ईएमआय कसा भरणार ? कृपया मला सांगा की भारतातील सर्वात महागड्या वकिलाची फीज कशी देणार आहेस ?

हे पण वाचा ;

बाबो.. ! रिया चक्रवर्तीला ही चूक पडू शकते महागात, सुशांतच्या बहिणीने आणली जगासमोर

सारासोबत ३ दिवस बॅंकॉकच्या हॉटेलमध्ये होता सुशांत - साबिर अहमद

काय आहे रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतच्या सिनेमाची सायनिंग अमाउंट १५ कोटीचं गुपित?

रियाला मुलाखतीवरून शेखर सुमन यांचा टोला, म्हणाले- माझ्याही स्वप्नात आला सुशांत आणि ...

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड