Join us  

बहिणीच्या अफेअरबाबत समजल्यावर कसा रिअ‍ॅक्ट झाला होता सुशांत? भावोजी विशालने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 10:09 AM

विशालने ब्लॉग लिहून सांगितले की, तीन महिन्यांनंतरही त्याचं आणि त्याच्या परिवाराचं दु:खं तसंच आहे. सोबतच त्याने सुशांतच्या फॅन्सना सांगितले की,  तो आता ब्लॉगच्या माध्यमातून सुशांतसोबतच्या सुंदर आठवणी शेअर करणार आहे.

गेल्या सोमवारी सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला तीन महिने पूर्ण झालेत. फॅन्सपासून ते परिवातील लोकांनी सुशांतच्या आठवणीत अनेक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या आहेत. तेच सुशांत सिंह राजपूतचा भावोजी विशाल किर्तीने यानिमित्ताने सुशांतची आठवण काढत जुन्या गोष्टींना उजाळा दिलाय. 

विशालने ब्लॉग लिहून सांगितले की, तीन महिन्यांनंतरही त्याचं आणि त्याच्या परिवाराचं दु:खं तसंच आहे. सोबतच त्याने सुशांतच्या फॅन्सना सांगितले की,  तो आता ब्लॉगच्या माध्यमातून सुशांतसोबतच्या सुंदर आठवणी शेअर करणार आहे. कारण याच्या आधारेच त्याचं आणि त्याच्या परिवाराच्या वेदना कमी होऊ शकतात.

विशालने या ब्लॉगमध्ये व्हिडीओ चॅट दरम्यान घेतलेला सुशांत सिंह राजपूतचा फोटो शेअर केलाय आणि लिहिले की, लंडनमध्ये राहत असल्याने तो, श्वेता सिंह किर्ती नेहमीच व्हिडीओ चॅट द्वारे संवाद साधत होते. यात विशालने सांगितले की, जेव्हा त्याच्या आणि श्वेताच्या अफेअरबाबत समजलं होतं तेव्हा सुशांत एका प्रोटेक्टिव भावासारखा वागू लागला होता. 

विशाल किर्तीने लिहिले की, 'जेव्हा मी आणि श्वेताने कॉलेज टाइममध्ये एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं तेव्हा सुशांत एका टिपिकल प्रोटेक्टिव भावाप्रमाणे माझ्या इंटेशनवर प्रश्न उपस्थित करू लागला होता. नंतर आम्ही त्याला जाणीव करून दिली की, आम्ही दोघे या नात्याबाबत फार सीरीअस आहोत. पण तो तेव्हाच मानला जेव्हा मी यूएसमधून परतलो आणि २००७ मध्ये श्वेतासोबत लग्न केलं होतं'.

हे पण वाचा :

शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम!

‘टॉप फिल्ममेकर’मुळे लागला होता सुशांतला ड्रग्जचा ‘चस्का’; रियाचा दावा!!

सुशांत आत्महत्या प्रकरणात CBIच्या हाती लागला मोठा पुरावा

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूड