Join us

13 जूनच्या रात्री अभिनेत्याच्या घरी आले होते 5-6 लोक, सुशांतचा मित्र गणेशचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 13:05 IST

अभिनेत्याच्या निधनानंतर त्याचा मित्र गणेश हिवरकरने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसंदर्भात दररोज नवे खुलासे होत आहेत. अभिनेत्याच्या निधनानंतर त्याचा मित्र गणेश हिवरकरने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. गणेश हिवरकरचा असा दावा आहे की 13 जूनच्या रात्री अभिनेत्याच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी  5 ते 6 जण त्याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये पोहोचले होते.

न्यूज 18च्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान गणेश हिवरकर म्हणाला, सप्टेंबर 2019 मध्ये मी सुशांतशी बोललो होतो तेव्हा तो  खूप सकारात्मक होता आणि पुढचे प्लॅनिंग करत होता. यानंतर गणेश म्हणाला, 13 जूनच्या रात्री 5 ते 6 लोक सुशांतच्या घरी गेले होते. हीच गोष्ट सुशांतच्या मित्रासोबत (संदीप सिंग) काम करणाऱ्या व्यक्तिने सांगितले. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दिशाच्या मृत्यूशी संबंधित असल्याचा दावा गणेशने केला.

सुशांतच्या डिप्रेशनवर इलाज करण्याच्या इराद्याने रिया चक्रवर्ती त्याला एका अध्यात्मिक गुरुकडे घेऊन गेली होती, असा नवा खुलासा झाला आहे. खुद्द या आध्यात्मिक गुरुनेच हा खुलासा केला आहे. ‘टाइम्स नाऊ’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या आध्यात्मिक गुरूंचे नाव मोहन सदाशिव जोशी आहे. चॅनलशी बोलताना जोशी यांनी रिया सुशांतला त्यांच्याकडे घेऊन आल्याचे सांगितले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत