Join us  

भावोजींनी शेअर केलेत सुशांतसोबतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रिनशॉट, या विषयावर व्हायची चर्चा

By रूपाली मुधोळकर | Published: September 21, 2020 11:22 AM

सुशांतच्या आठवणीत त्याच्या भावोजींनी हे चॅट शेअर केले आहे. 

ठळक मुद्देविशाल यांच्या मते, सुशांत पुस्तकांवर प्रचंड प्रेम करायचा. तो खरा बुद्धिजीवी होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला. अद्यापही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. याचदरम्यान सुशांतचे भावोजी विशाल किर्ती यांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. सुशांत व त्यांच्यात झालेले हे चॅट सध्या व्हायरल होतेय. हे चॅट अनेकार्थाने खास आहे. सुशांतच्या आठवणीत त्याच्या भावोजींनी हे चॅट शेअर केले आहे. मी सुशांतसोबतच्या एका बौद्धिक चॅटच्या काही सुंदर आठवणी शेअर करतोय, असे लिहित त्यांनी या चॅटचे स्क्रिनशॉट्स उघड केले आहेत.

या चॅटमध्ये विशाल किर्ती आणि सुशांत सिंग राजपूतला आपआपसात नॉन-फ्रिक्शन आणि लेजेंडरी क्लासिक्सवर चर्चा करत आहेत. म्हणजेच दोघांची विज्ञानावर चर्चा होतेय.

विशाल यांच्या मते, सुशांत पुस्तकांवर प्रचंड प्रेम करायचा. तो खरा बुद्धिजीवी होता. यापूर्वी विशाल किर्तीने सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेला समर्थन दिले होते. शिबानी दांडेकरने अंकितावर टीका केल्यानंतर विशाल किर्तीने अंकिताला पाठींबा दिला होता.

  शेअर केली होती भावूक पोस्ट

काही दिवसांआधी सुशांतच्या भावोजींनी एक भावूक पोस्ट शेअर केली होती. सुशांत त्याच्या बहिणींप्रती किती प्रोटेक्टिव्ह होता, हे त्यांनी यात सांगितले होते. विशाल यांनी लिहिले होते की,‘ मी आणि श्वेता (सुशांतची बहीण) आम्ही दोघांनी कॉलेजमध्ये डेटींग सुरु केले तेव्हा सुशांत मला एका टिपिकल प्रोटेक्व्हि भावासारखा प्रश्न विचारायचा. श्वेताबद्दल मी काय विचार करतो, तिच्याबद्दल मला काय वाटते, हे जाणून घेण्याचा त्याचा प्रयत्न मी पाहिला आहे. आम्ही या नात्याबद्दल खूप गंभीर आहोत, हे मी त्याला पूरेपूर प्रयत्न केला. मात्र 2007 मध्ये मी श्वेतासोबत लग्न करण्यासाठी युएसमधून परत येईपर्यंत सुशांतचा विश्वास बसला नव्हता. मी लग्न करण्यासाठी अमेरिकेहून भारतात आलो, तेव्हा कुठे तो बहिणीबद्दल आश्वस्त झाला होता. यानंतरचा तर सगळा इतिहास आहे. सुशांतच्या जाण्याच्या धक्का पचवणे कठीण आहे. जे काही घडले, ते अविश्वसनीय आहे. आम्ही हसण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचवेळी आत अपराधीपणाची भावना दाटून येते. सुशांतला गमावल्यानंतर आम्हाला हसण्याचा अधिकार आहे? असा प्रश्न मनात निर्माण होतो. सगळे काही सामान्य व्हायला आणखी खूप काळ जावा लागणार आहे. आम्ही सगळे या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. काळासोबत सगळे काही ठीक होईल, असा विश्वास आहे,’ असे विशाल किर्ती यांनी लिहिले होते.

सुशांतच्या फार्महाऊसमधून सापडल्या काही नोट्स, मोठे खुलासे होण्याची शक्यता

एनसीबीच्या टार्गेटवर आता सॅमचा 'बॉस', बॉलीवूडमध्ये 'ड्रग अंकल' म्हणून ओळख

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत