क्रिती सॅननसोबतच्या अफेयरविषयी सुशांत सिंग राजपुतने तोडली चुप्पी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 14:23 IST
अभिनेता सुशांत सिंग राजपूत असा कलाकार आहे, ज्याने कमित कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याच्याजवळ आज ...
क्रिती सॅननसोबतच्या अफेयरविषयी सुशांत सिंग राजपुतने तोडली चुप्पी!!
अभिनेता सुशांत सिंग राजपूत असा कलाकार आहे, ज्याने कमित कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याच्याजवळ आज चित्रपटांची रीघ लागलेली आहे. ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या यशाने, तर त्याच्याकडे बॉलिवूडचा नेक्स्ट सुपरस्टार असे बघितले जात आहे. मात्र सध्या सुशांत त्याच्या चित्रपटामुळे नव्हे तर त्याच्या गर्लफ्रेण्डमुळेच अधिक चर्चेत आहे. लाँग टाइम गर्लफ्रेण्ड असलेल्या अंकिता लोखंडे हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत सध्या क्रिती सॅनन हिच्या प्रेमात पडला आहे. ‘राबता’ या चित्रपटाची को-स्टार असलेल्या क्रितीसोबतची सुशांतची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. सुशांतच्या नव्या कारसोबत क्रिती अन् त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्यातील गुफ्तगुबाबत अधिकच चर्चा रंगविली जात आहे. त्यामुळे वैतागलेल्या सुशांतने या फोटोमागील रहस्य उलगडताना एकप्रकारे क्रितीसोबतच्या प्रेमाची कबुली दिली आहे. या फोटोविषयीचे रहस्य उलगडताना सुशांतने मुंबई मिररला सांगितले की, ‘जेव्हा मी ही कार खरेदी केली होती, तेव्हा मी एकटाच फिरायला निघालो होतो. तेव्हा मात्र माझा कोणीही फोटो काढला नाही. मात्र क्रिती माझ्यासोबत येताच फोटो काढणाºयांचा जणू काही उत्साह वाढला. गेल्या काही दिवसांपासून माझ्या आणि क्रितीच्या रिलेशनशिपवर केले जात असलेले गॉसिप वाचत आहे. कधी आमच्या ब्रेकअप विषयी, तर कधी आमच्या पॅचअप विषयी लिहिले जात आहे. हे सगळं वाचायला आनंद मिळतो, मात्र मला सांगावेसे वाटते की, असे काहीच नाही. ती अभिनेत्री होण्याअगोदर इंजिनिअर राहिलेली आहे. मीदेखील इंजिनिअरिंगची पद्वी मिळविली आहे. आम्हाला जेवण्याचा खूप शौक आहे. शिवाय ती पण दिल्लीची असल्याने आम्हाला एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायला आवडतो. मात्र लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला असून, त्यावर खरमरीत चर्चा करायला सुरुवात केल्याचे त्याने सांगितले. सुशांत आणि क्रिती ‘राब्ता’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले असून, प्रेक्षकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय प्रेक्षकांना सुशांत आणि क्रितीची आॅनस्क्रीन केमिस्ट्रीही चांगलीच भावत आहे. चित्रपटात सुशांत आणि क्रितीची प्रेमकथा वेगवेगळ्या काळात दाखविण्यात आली आहे. कालच या चित्रपटातील एका प्रमुख पात्राचा लुक मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. ‘ट्रॅप्ड’ आणि ‘क्वीन’ या चित्रपटात झळकलेला राजकुमार राव या चित्रपटात ३२४ वर्षांच्या म्हाताºया व्यक्तीच्या भूमिकेत आहे. त्याचा हा लुक आश्चर्यचकीत करणारा आहे. वास्तविक क्रिती आणि सुशांत यांच्यातील अफेयरची सुरुवात याच चित्रपटातून सुरू झाली आहे. कारण शूटिंगपासूनच हे दोघे एकमेकांसोबत असे काही रमले आहेत की, त्यांच्यात काहीतरी असावे असा समज होणे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर असेही बोलले जात आहे की, सुशांतने क्रितीच्या परिवारातील लोकांची भेट घेतली आहे. तसेच त्याने एकता कपूरविषयी रंगविल्या जाणाºया चर्चेवरही आपले मत व्यक्त केले असून, ही एक चुकीची बातमी आहे. एकता कपूरनेच सुशांतला छोट्या पडद्यावर पहिला ब्रेक दिला आहे.