Join us  

म्हणे, तुझ्या पापांचा घडा आता भरला...! राखी सावंत पुन्हा बरळली, रिया चक्रवर्तीवर घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 5:16 PM

सुशांत सिंग राजपूत पुनर्जन्म घेईल आणि त्याचा जन्म माझ्या पोटी होईल, असा दावा करणारी ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत आता ...

ठळक मुद्देसुशांत स्वप्नात आल्याचा दावा करणा-या राखीचा हा व्हिडीओ पाहून  चाहत्यांचा रोष शिगेला पोहोचला होता. लोकांनी राखीला जबरदस्त ट्रोल केले होते.

सुशांत सिंग राजपूत पुनर्जन्म घेईल आणि त्याचा जन्म माझ्या पोटी होईल, असा दावा करणारी ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत आता रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांच्यावर घसरली आहे. तुझ्या पापांचा घडा आता भरला आहे, अशा शब्दांत तिने रियाला सुनावले आहे. महेश भट यांना ‘खुजलीवाला बु्ड्ढा’ म्हणत तिने त्यांची जोरदार खिल्ली उडवली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणा-या राखीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीने रियाची जबरदस्त खिल्ली उडवली आहे. ‘आमचा सुशांत दिवसरात्र काम करत होता. तू त्याच्या पैशांवर शॉपिंग करत मजा केली. मला कॉपी करण्याचा प्रयत्न करू नकोस. कोरोनाची शिकाऱ़... रिया चक्रवर्ती तू आयुष्यात कधीही राखी सावंतची कॉपी करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्या मागे सीबीआय लावेल. तुझ्या पापांचा घडा भरला आहे. सीबीआय तुला सोडणार नाही. डोन्ट कॉपी मी,’ असे राखी सावंत या व्हिडीओत म्हणतेय.मला सुशांतचे स्वप्न आले होते, असे तू म्हणालीस. तू मला कॉपी केलेस? सुशांत फक्त माझ्या स्वप्नात आला, असेही राखी या व्हिडीओत म्हणतेय.

मी तुझ्या पोटी जन्म घेईन....

याआधी राखी सावंतने असाच एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मी रात्री झोपले होते आणि अचानक मला मोठा धक्का बसला. मी विचारले की कोण आहे? मग आवाज आला  मी सुशांत. माझा विश्वास आहे की, सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, मी पुन्हा जन्म घेत आहे. माझ्या चाहत्यांना सांग की, मी पुन्हा जन्मलो. मी म्हणाले कसे? त्यानंतर तो म्हणाला, मी लवकरच सांगेन. पुन्हा मी म्हणाले, मला सांग. तर सुशांत म्हणाला, राखी तू लग्न करशील आणि मी तुज्या पोटी जन्म घेईन, असे राखी या व्हिडीओत म्हणाली होती.

झाली होती ट्रोलसुशांत स्वप्नात आल्याचा दावा करणा-या राखीचा हा व्हिडीओ पाहून  चाहत्यांचा रोष शिगेला पोहोचला होता. लोकांनी राखीला जबरदस्त ट्रोल केले होते.

  

टॅग्स :राखी सावंत