Join us  

'बधाई हो', 'बालिका वधु' फेम सुरेखा सिक्रीकडे नव्हते उपचारासाठी पैसे, मददतीसाठी पुढे आला सोनू सूद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 10:55 AM

सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जुहूमधील क्रिटीकेअर रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, स्ट्रोकमुळे त्यांच्या मेंदुत क्लॉट झाला आहे, जो औषधांच्या मदतीने काढला जाईल.

'बधाई हो', 'बालिका वधु'  भूमिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री  सुरेखा सिक्री सध्या अडचणींचा समाना करत आहे. सुरेखा सध्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या उपचारांसाठीदेखील त्यांच्याकडे पैसे नाहीत.अशात दिवसेंदिवस तब्येत नाजूक असून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जुहूमधील क्रिटीकेअर रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, स्ट्रोकमुळे त्यांच्या मेंदुत क्लॉट झाला आहे, जो औषधांच्या मदतीने काढला जाईल. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सुरेखा यांच्याकडे उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याचे माहिती समोर आली होती. गेल्या 36 तासांपासून त्यांच्या आयसीयूत उपचार सुरु आहेत.

अभिनेता सोनू सूदनेही त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. ज्या रुग्णालयात सुरेखा उपचार घेत आहेत तिथे फी अधिक आहे. आता सुरेखा यांच्या कुटुंबाकडे योग्य उपचार घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. हे पाहून सुरेखाची काळजी घेणा-या नर्सने बॉलिवूडला मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. या अपीलनंतर सोनू सूद सुरेखा सिक्री यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सुरेखाजी यांची तब्येत जाणून घेतल्यानंतर सोनू सूदने  ट्वीट करून लिहिले की, 'आता पूर्वीपेक्षा त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद.' सोनू सूदनंतर ‘बधाई हो’ या चित्रपटातील त्यांचे सहकलाकार गजराज राव आणि दिग्दर्शक अमित शर्मा त्यांच्या आर्थिक मदतीसाठी धावून आले. 

'बालिका वधू' शिवाय सुरेखा सिक्री यांनी 'परदेश में है मेरा दिल', 'एक था राजा एक थी रानी' अशा बर्‍याच टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ती 'बधाई' चित्रपटातही दिसली. नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांना पहिल्यांदा ब्रेन स्ट्रोक आला होता. 

टॅग्स :सोनू सूद