सूरज पांचोली झळकणार प्रभू देवाच्या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 14:45 IST
बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर सूरज पांचोलीने दोन वर्षांच्या आपल्या करिअरमधवा तिसरा चित्रपट साइन केला आहे. त्याचा पुढचा चित्रपट एक्शन आणि ...
सूरज पांचोली झळकणार प्रभू देवाच्या चित्रपटात
बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर सूरज पांचोलीने दोन वर्षांच्या आपल्या करिअरमधवा तिसरा चित्रपट साइन केला आहे. त्याचा पुढचा चित्रपट एक्शन आणि कॉमेडी असणार आहे. प्रभुदेवा या चित्रपटाचा दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाबाबत एक महिन्यापासून चर्चा सुरु आहे. सूरज पांचोलीचे आधीचे चित्रपट फ्लॉप ठरल्याने तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट खूप विचारपूर्वक निवडतो आहे. सूरजने ट्विटरवर प्रभुदेवा आणि निर्माता भूषण कुमारसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोखाली त्यांने कॅप्शन दिले आहे प्रभुदेवा तुझ्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. मी तुला बघूनच लहानाचा मोठा झाले आहे. हा चित्रपट कॉमेडी आणि अॅक्शनने भरपूर असणार आहे. सूरजला रेमो डिसूजा आणि अजय देवगनच्या चित्रपटाचे स्क्रिप्ट पण आवडले होते तरीही त्यांने प्रभूदेवाच्या चित्रपटाची निवड केली. याचित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करतायेत. याचित्रपटात सूरज आपले डान्सचे जलवे दाखवताना दिसू शकतो. सूरजने हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल आडवाणीने केले होते. यात त्याच्यासह अथिया शेट्टी झळकली होती. हा चित्रपट सुभाष घई यांच्या 1983 साली आलेल्या चित्रपटचा रिमेक होता.