Join us  

Sur Jyotsna Award : लोकमतच्या ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये श्रेया घोषालला मिळाली फिल्मफेअर जिंकल्याची गोड बातमी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 10:08 AM

काल रात्री रंगलेल्या ६४ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडची लोकप्रिय पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर अर्थात सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासाठी श्रेयाच्या नावाचा पुकारा झाला, तेव्हा ती हा पुरस्कार घ्यायला हजर नव्हती. कारण...

ठळक मुद्देकहते है ये दीवानी... म्हणत श्रेया घोषाल मंचावर आली आणि माहौल मस्तानी झाले...

काल रात्री रंगलेल्या ६४ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडची लोकप्रिय पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर अर्थात सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासाठी श्रेयाच्या नावाचा पुकारा झाला, तेव्हा ती हा पुरस्कार घ्यायला हजर नव्हती. कारण नेमक्या त्याच वेळी लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत मीडिया ग्रूपतर्पे आयोजित ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये श्रेया गात होती. नागपुरात रंगलेल्या याच ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये श्रेयाने ‘घुमर घुमर...’ हे गाणे सादर केले. तिच्या याच गाण्याला सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार जाहिर झाला. एकीकडे नागपूरकरांनी श्रेयाच्या ‘घुमर घुमर...’ या गाण्यावर ताल धरला आणि दुसरीकडे याच गाण्यासाठी श्रेयाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याची गोड बातमी आली.

या दुग्धशर्करा योगायोगाचे सेलिब्रेशनही झाले. ‘लाईव्ह कॉन्सर्ट’च्या मंचावर फिल्मफेअर जिंकल्याबद्दल श्रेयाला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. श्रेयाने अगदी नम्रपणे नागपूरकरांच्या वतीने या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि पुढे आपल्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी नागपूरकरांना मंत्रमुग्ध केले.

कहते है ये दीवानी... म्हणत श्रेया घोषाल मंचावर आली आणि माहौल मस्तानी झाले... नागपूर में आ के बहोत ही अच्छा लग रहा है... असे म्हणत श्रेयाने नागपुरकरांना साद घातली... चंदेरी ड्रेस घालून श्रेया स्टेजवर आली आणि स्वरांच्या या मस्तानीने नागपुरकरांना वेड लावले. 

टॅग्स :श्रेया घोषालसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार