Join us  

​सनीने गायले चुकीचे राष्ट्रगीत, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2016 9:49 AM

प्रो कबड्डी लीग स्पर्धेदरम्यान एका सामन्याच्या सुरुवातीला सनी लियोनने राष्ट्रगीत गायले. मात्र राष्ट्रगीत गाताना सनीने सिंधच्या जागी सिंधु असे ...

प्रो कबड्डी लीग स्पर्धेदरम्यान एका सामन्याच्या सुरुवातीला सनी लियोनने राष्ट्रगीत गायले. मात्र राष्ट्रगीत गाताना सनीने सिंधच्या जागी सिंधु असे म्हणले, जे की चुकीचे आहे. यावरुन सनीवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीच्या न्यू अशोकनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. तिच्या राष्ट्रगीत  गाणाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर जागोजागी तिचे चाहते सनीचे कौतुक करत आहेत मात्र आता ती अडचणीत आली आहे.सनीने चुकीचे राष्ट्रगीत गायले असून राष्ट्रगीत सुरु असताना कॅमेरामन फिरताना दिसले. हे चुकीचे असल्याचे सांगत उल्हास नामक व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे.