Join us

​अन् साप पाहून सनी लिओनीची उडाली घाबरगुंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 15:47 IST

सध्या सनी लिओनीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. स्वत: सनीनेही हा व्हिडिओ तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही हसून हसून पोट दुखणार हे नक्की.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आपला आगामी चित्रपट ‘तेरा इंतजार’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सध्या सनीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. स्वत: सनीनेही हा व्हिडिओ तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही हसून हसून पोट दुखणार हे नक्की. कारण हा व्हिडिओ आहेच तसा. सनीच्या एका टीम मेंबरला तिची गंमत करण्याचे सुचले अन् मग सनीची चांगलीच घाबरगुंडी उडाली. या टीम मेंबरने सनीला साप दाखवून असे काही घाबरवले की, सनी जोरजोरात ओरडायला लागली आणि सरतेशेवटी त्या टीम मेंबरला मारायला धावत सुटली. हा व्हिडिओ पाहून सनी सापांना किती घाबरते, हे तुम्हाला कळून चुकेल. हा व्हिडिओ तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. सनीचा राजीव वालिया दिग्दर्शित ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट १ डिसेंबरला नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा ‘टार्जन द वंडर कार’शी मिळती जुळती असल्याचे सांगितले जाते. सनी अरबाजवर प्रचंड प्रेम करत असते. पण काही लोक अरबाजची हत्या करतात आणि सनीला त्रास देणे सुरु करतात. यानंतर अरबाजची आत्मा सनी लिओनीला सोबत करते आणि सगळ्यांचा सूड घेते, अशी कथा यात पाहायला मिळणार आहे.अलीकडे   सनी लिओनीने जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली  होती. जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे रोजच उशिरा होत असल्यामुळे आम्हाला मागील आठवड्यात प्रचंड त्रास सहन करावा लागलायं. जेटच्या गोंधळामुळं आठवडाभर माझी झोपही पूर्ण होऊ शकली नाही,असा त्रागा सनीने व्यक्त केला होता.ALSO READ : OMG : ​‘या’ कारणाने आठवडाभर झोपू शकली नव्हती सनी लिओनी !  सनी आणि तिचा पती डॅनिअल यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली, मुंबई व अहमदाबादेतून जेटच्या विमानांनी प्रवास केला. त्यांनी चारवेळा जेटची फ्लाइट पकडली. पण चारही वेळा उड्डाणांना सुमारे तासभर उशीर झाला.