Join us

सनी लिओनीची ‘लैला’ येणार पुढच्या आठवड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 11:33 IST

सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे. शाहरुख स्टारर ‘रईस’ चित्रपटातील तिचे आयटम साँग ‘लैला ओ लैला’ हे पुढील ...

सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे. शाहरुख स्टारर ‘रईस’ चित्रपटातील तिचे आयटम साँग ‘लैला ओ लैला’ हे पुढील महिन्याएवजी पुढच्या आठवड्यातच रिलीज करण्यात येणार आहे.बहुप्रतीक्षित ‘रईस’च्या ट्रेलरमध्ये सनीची एक झलक पाहायला मिळाली आणि सर्वांनाच आश्चर्य झाले. सनी ‘लैला ओ लैला’ म्हणत ठुमके मारणार म्हटल्यावर सर्वांनाच या गाण्याची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. चित्रपटाच्या थोडेसे आधी हे गाणे लाँच करण्याचा निर्मात्यांचा विचार होता.मात्र आता फेरविचार करून त्यांनी पुढील आठवड्यातच ते रिलीज करण्याचा निर्णय घेतला. नववर्षाच्या फेस्टिव्ह काळात गाण्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन चित्रपटाविषयी बझ क्रिएट करण्याची त्यांची योजना आहे.तसेच बॉक्स आॅफिसवर टक्कर होणाऱ्या ‘काबील’ चित्रपटातील उर्वशी रौतेलाचे आयटम साँग ‘सारा जमाना’ रिलीज झाल्यामुळेही त्यांना चिंता झाली असावी. जास्तीत जास्त प्रकाशझोतात राहण्यासाठी त्यांना घाई करावी लागली, अशी इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे.रईस : शाहरुख खानकिंग खानच्या सिनेमात काम करण्याचे सनीचे स्वप्न या गाण्यामुळे पूर्ण होतेय म्हटल्यावर ती जाम खूश आहे. चित्रपटात ऐंशीच्या दशकातील कथानक असणाऱ्या ‘रईस’मध्ये शाहरुख दारू माफिया रईस आलमची भूमिका साकारत असून त्याच्यासोबत पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान आणि नवाजुद्दिन सिद्दिकी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.