Join us

​आता तेलगू चित्रपटात दिसणार सनी लिओनीचा ‘जलवा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 12:46 IST

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी सनी लिओनी सध्या जोरात आहे. होय, बॉलिवूड गाजवल्यानंतर सनी लिओनी ...

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी सनी लिओनी सध्या जोरात आहे. होय, बॉलिवूड गाजवल्यानंतर सनी लिओनी आता साऊथकडे निघालीयं. होय, सनीने आता  दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवला आहे. दिग्दर्शक प्रवीण सुत्तारू यांच्या ‘पीएसव्ही गरुडा वेगा’ या आगामी तामिळ चित्रपटात सनी थिरकताना दिसणार आहे.  सुत्तारु यांनी ‘पीएसव्ही गरुडा वेगा’ या चित्रपटातील एका खास गाण्यासाठी सनीला करारबद्ध केले आहे. या चित्रपटातील एका स्पेशल गाण्यासाठी मला सनीच हवी होती. सनीच माझी पहिली पसंती होती, असे सुत्तारू म्हणाले. एका महत्त्वाच्या वळणावर सनीचे हे गाणे चित्रपटात येते. त्यामुळे या गाण्यात एक अनोखा चेहरा असणे फार आवश्यक होते. तमिळ सिनेसृष्टीतही अनेक चांगले पर्याय आमच्याकडे उपलब्ध होते. पण सनीचे चित्रपटात असणे ही एक गोष्टच प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी पुरेशी आहे. सनीचे गाणे आहे म्हणजे आयटम साँग नसून कथानकाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.हे गाणे चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये दाखवले जाणार आहे. केरळमध्ये चित्रित करण्यात येणाºया या गाण्यात सनी एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. तामिळ अभिनेता राजशेखर हा पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. याशिवाय पूजा कुमार,श्रद्धा दास आणि अदिथ अरूण यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे.अलीकडे ‘रईस’ या चित्रपटात सनी ‘लैला’ या आयटम साँगवर थिरकताना दिसली होती. या गाण्याच्या निमित्ताने किंगखान शाहरूख खान याच्यासोबत काम करण्याचे सनीचे स्वप्न सत्यात उतरले होते.  ‘लैला’ गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. आता तेलगू चित्रपटातील सनीच्या गाण्याला किती पसंती मिळते, ते बघूच!