Join us  

सनी लियोनीला आहे ही वाईट सवय, या सवयीला कंटाळलाय तिचा नवरा डॅनियल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 2:50 PM

सनी लियोनीच्या पतीनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे.

ठळक मुद्देसनीने पोस्ट केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून केवळ काहीच तासांत पाच लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. हा व्हिडिओ अतिशय फनी असल्याचे ते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

सनी लियोनी सध्या सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. तिचा पती डॅनियल वेबरनचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ अतिशय मजेदार असून हा व्हिडिओ पाहून तुम्ही खळखळून हसाल यात काहीच शंका नाही. 

सनी लियोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत तिच्या पतीच्या हातात एक कार्ड दिसत असून तो फॅन्सना सांगत आहे की, सनी सकाळी उठते... अतिशय चविष्ट जेवण बनवते... तसेच खूप चांगले कपडे घरात देखील परिधान करते. पण हे सगळे डॅनियल सांगत असताना त्याच्या हातात असलेल्या कार्डवर लिहिलेले आहे की, माझी तुम्ही मदत करा... ती सतत झोपलेली असते. ती अजिबात चांगले जेवण बनवत नाही... ती खूपच आळशी असून घरात नेहमीच पायजमा घालून फिरते. 

डॅनियल हा व्हिडिओ शूट करत असताना सनी त्याच्या बाजूने जाताना दिसते. पण तो कोणता व्हिडिओ बनवत आहे याची तिला अजिबातच कल्पना नसल्याचे आपल्याला जाणवते. हा व्हिडिओ सनीनेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला असून त्यासोबत लिहिले आहे की, आता बदला घेण्याची वेळ आली आहे. सनीने पोस्ट केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून केवळ काहीच तासांत पाच लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. हा व्हिडिओ अतिशय फनी असल्याचे ते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. सध्या सेलिब्रेटी आपापल्या घरात असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहेत.  

टॅग्स :सनी लिओनी