सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही ‘शूटिंग इन प्रोग्रेस’ असे लिहिले आहे. चित्रपटात अत्यंत उच्च दर्जाचे व्हिजुअल इफेक्ट्सचा वापर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. या भूमिकेसाठी सनीने घोडस्वारीदेखील शिकली आहे. त्याचबरोबर तलवारबाजीचेही प्रशिक्षण घेतले आहे. सनी पहिल्यांदाच साउथ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या अगोदरही सनीने साउथच्या चित्रपटात काम केले आहे. मात्र त्यात ती आयटम नंबर्स करतानाच बघावयास मिळाली आहे. दरम्यान, सनीचा ‘वीरमादेवी’चा अवतार सध्या सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.}}}} ">So beyond excited to share this with you! First look poster of #veeramadevi#veeramahadevi#veermahadevi@steevescorner#veeramadevifirstlook#veeramahadevifirstlookpic.twitter.com/wYxzUp7Oft— Sunny Leone (@SunnyLeone) May 18, 2018
सनी लिओनीच्या ‘वीरमादेवी’चा फर्स्ट लूक आला समोर; यौद्धाच्या भूमिकेत दिसत आहे सनी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 20:55 IST
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिच्या आगामी ‘वीरमादेवी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला असून, त्यामध्ये ती यौद्धाच्या भूमिकेत बघावयास ...
सनी लिओनीच्या ‘वीरमादेवी’चा फर्स्ट लूक आला समोर; यौद्धाच्या भूमिकेत दिसत आहे सनी!
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिच्या आगामी ‘वीरमादेवी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला असून, त्यामध्ये ती यौद्धाच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. सनी लिओनीने आपल्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना तिने लिहिले की, ‘तुम्हा लोकांसोबत हे पोस्टर शेअर करताना मी खूपच उत्साहित आहे.’ वीरमादेवी या चित्रपटात सनी एका यौद्धाच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट एक वॉर ड्रामा आहे. त्याचबरोबर सनी या चित्रपटाच्या माध्यमातूनच तामिळमध्ये डेब्यू करीत आहे. हा एक पीरियड ड्रामा बेस्ड चित्रपट आहे. निर्माते हा चित्रपट तामिळबरोबरच कन्नड, मल्याळम, तेलगू आणि हिंदीमध्येही प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. बिग बजेट असलेल्या ‘वीरमादेवी’चे दिग्दर्शन वीसी वादीवुदयान यांनी केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सनी एका यौद्धाची भूमिकेत दिसत असून, घोड्यावर बसून ती युद्धभूमीवर दिसत आहे.