Join us  

सनी लिओनी जे बंगळुरूत करू शकली नाही ते दिल्लीत करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 4:40 PM

बॉलिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी हिचा न्यू इअरच्या पूर्वसंध्येला कर्नाटक, बंगळुरू येथे होणारा कार्यक्रम वादाच्या भोवºयात सापडला होता. तिच्या ...

बॉलिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी हिचा न्यू इअरच्या पूर्वसंध्येला कर्नाटक, बंगळुरू येथे होणारा कार्यक्रम वादाच्या भोवºयात सापडला होता. तिच्या या कार्यक्रमावरून कर्नाटकात सरकारविरोधात एक गट चांगलाच सक्रिय झाला होता. त्यामुळे सनी लिओनीला कर्नाटक आणि बंगळुरू येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले. यावेळी सनीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना कार्यक्रम रद्द करणार असल्याचे स्पष्ट केले होते. चाहत्यांच्या सुरक्षेसाठी मी हा निर्णय घेतल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र सनीने जे बंगळुरूमध्ये केले नाही ते ती दिल्लीत करणार आहे. होय, सनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोहरीचे औचित्य साधून येत्या १३ जानेवारीला सनी दिल्लीत असणार आहे. याठिकाणी ती धमाकेदार परफॉर्मन्सही करणार आहे. विशेष म्हणजे दिल्लीत ती एकटीच येणार नाही, तर तिच्यासोबत ‘बेबी डॉल मैं सोने दी’ या सनीच्या प्रसिद्ध गाण्याची गायिका कनिका कपूरही असणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सनी लिओनी, गायिका कनिका कपूर आणि रोशनी चोपडा उपस्थित राहणार आहेत. सनीच्या या शोचे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी इंदौर स्टेडिअममध्ये होणार आहे. गेल्या वर्षी सनीला कर्नाटकात विरोध झाल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. मात्र आता ती दिल्लीत थिरकणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच समाधान व्यक्त केले जात असेल. दरम्यान, गेल्यावर्षी सनी लिओनी ‘तेरा इंतजार’ या चित्रपटात झळकली होती. तिच्यासोबत अरबाज खान मुख्य भूमिकेत बघावयास मिळाला. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नाही. त्याचबरोबर ती गेल्यावर्षी शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातील आयटम सॉँगमध्ये झळकली होती.