Join us

  ‘कुमकुम भाग्य’ पाहून सनी लिओनी शिकतेय अ‍ॅक्टिंग! व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 15:57 IST

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी टीव्हीच्या मालिका पाहत असेल का? कधीकाळी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर हो असे आहे. होय, सनी सुद्धा ‘सास बहू’ ड्रामा पाहते. तेही हटके अंदाजात.

ठळक मुद्दे सनी लिओनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे.

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी टीव्हीच्या मालिका पाहत असेल का? कधीकाळी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर हो असे आहे. होय, सनी सुद्धा ‘सास बहू’ ड्रामा पाहते. तेही हटके अंदाजात. सनी टीव्ही म्यूट करते अन् मालिकेतील कलाकारांचे डायलॉग स्वत: म्हणते. आश्चर्य वाटले ना पण ते खरे आहे.सनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत  ती टीव्ही पाहताना दिसत आहे. मात्र तिने टीव्ही म्यूट केलेला असून सनी स्वत: या शोमधील अभिनेता आणि अभिनेत्रीचे डायलॉग स्वत:च म्हणताना दिसत आहे.

 सनीचा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. व्हिडिओमध्ये सनीचा टीव्ही म्यूट आहे आणि सनी स्वत: शोमधील कलाकारांचे डायलॉग म्हणतेय.  हे डायलॉगही चांगलेच मजेदार आहेत.  हा व्हिडिओ शेअर करताना सनीने अ‍ॅक्टिंगची प्रॅक्टिस करत असल्याचे सांगितले आहे.

‘धन्यवाद कुमकुम भाग्य, श्रीति झा आणि शब्बीर अहलूवालिया. तुमचा शो पाहणे हा माझा बेस्ट टाइमपास असतो,’ असे तिने लिहिले आहे.  सनी लिओनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे.

याशिवाय एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे. ‘रंगीला’ या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘कोका कोला’नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे. याशिवाय आणखी एक काम सनीने हाती घेतले आहे. ते म्हणजे,बच्चेकंपनीसाठीची शाळा. होय, सनी व तिचा पती डेनियल वीबर लवकरच एक शाळा उघडणार आहेत.

टॅग्स :सनी लिओनी