सनी लिओनीने सलमान खानसोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 15:58 IST
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेल्या सनी लिओनी हिने जगभरात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मात्र यामागे ...
सनी लिओनीने सलमान खानसोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा!!
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेल्या सनी लिओनी हिने जगभरात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मात्र यामागे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचा हात आहे असे जर कोणी म्हटल्यास वावगे ठरू नये. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाउल ठेवणाºया सनीचे म्हणणे आहे की, सलमानसोबत माझे नाते नेहमीच विनम्र आणि मैत्रिपूर्ण राहिले आहे. त्यासाठी मी नेहमीच त्याचे आभारही मानले आहेत. बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदर सनी बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये आली होती. या शोचा होस्ट सलमान खान याने तिला त्यावेळी बरीचशी मदतही केली होती. सध्या सनी राजीव वालियाच्या ‘तेरे इंतजार में’ या रोमॅण्टिक संगीतमय चित्रपटात सलमानचा भाऊ अरबाज खान याच्याबरोबर काम करीत आहे. सलमानविषयी बोलताना सनीने म्हटले की, ‘मी सलमान खानला बºयाचदा भेटली आहे. शिवाय अरबाजसोबतही मी बºयाच काळ व्यतित केला आहे. अरबाज एक व्यक्ती म्हणून खूपच चांगला आहे. मला असे वाटते की, त्याचा पूर्ण परिवार आणि भाऊ खूप चांगले असून, एकमेकांची काळजी घेणारे आहेत. सनी नुकतीच शाहरूख खान अभिनित ‘रईस’ या चित्रपटात आयटम सॉन्ग करताना बघावयास मिळाली होती. तिचा हा आयटम नंबर खूपच गाजला. त्याचबरोबर तिने सोनाक्षी सिन्हाच्या ‘नूर’ या चित्रपटातही असाच जलवा दाखविला होता. सध्या सनी अजय देवगण आणि इमरान हाशमी यांच्या आगामी ‘बादशाहो’मध्ये आयटम नंबर करताना बघावयास मिळणार आहे. या गाण्यात ती इमरानसोबत रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. याविषयी सनीने म्हटले की, मला इमरानसोबतचे ते गाणे खूपच आवडते. ‘बादशाहो’मध्ये काम करण्याचा अनुभव खूपच मजेशीर होता. इमरानचे कौतुक करताना सनीने म्हटले की, इमरान खूपच प्रामाणिक आणि मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. सनीने पुढे बोलताना म्हटले की, ते गाणे करताना खूपच मजा आली. शिवाय लोकांनाही हे गाणे खूप आवडेल, याची मला अपेक्षा आहे. सनी लिओनी या गाण्यात पारंपरिक लुकमध्ये बघावयास मिळणार आहे. दरम्यान, सनीने पॉर्न स्टारची इमेज बदलून स्वत:ला बॉलिवूडमध्ये स्थिर केले आहे. कमीत कमी कालावधीत सनीने बॉलिवूडमध्ये यश मिळविले आहे.