चित्रपटात बोल्ड सीन देण्यापूर्वी सनी लिओनी ठेवते ‘या’ अटी आणि शर्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 19:48 IST
बॉलिवूडची लैला सनी लिओनी चित्रपटात बोल्ड सीन देण्याअगोदर निर्मात्यांसमोर काही अटी आणि शर्ती ठेवते, वाचा सविस्तर!
चित्रपटात बोल्ड सीन देण्यापूर्वी सनी लिओनी ठेवते ‘या’ अटी आणि शर्ती!
बॉलिवूडची लैला सनी लिओनी हिला कोणी ओळखत नसेल असे क्वचितच म्हणावे लागेल. कारण आपल्या हॉट अंदाजामुळे सनी सध्या बॉलिवूडची सनसनी बनली आहे. विशेष म्हणजे तिच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. सनीने आतापर्यंत बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. वास्तविक हे सगळ्यांनाच माहिती आहे की, सनी पोर्न इंडस्ट्रीची स्टार राहिली असून, आता ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे. त्यामुळेच कदाचित तिच्यावर अशाप्रकारच्या कॉमेण्ट्स केल्या जातात की, सनी बॉलिवूड चित्रपटांना पोर्न चित्रपटांकडे घेऊन जात आहे. याच अनुषंगाने आज आम्ही सनी चित्रपटात बोल्ड सीन्स देण्याअगोदर दिग्दर्शकांसमोर काय अटी आणि शर्ती ठेवत असते? याविषयी सांगणार आहोत. चित्रपटातील बोल्ड सीन्सवरून बºयाचदा सनी लिओनीबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. सनीला बोल्ड सीन्स देण्यात काहीच वावगे वाटत नसेल किंवा ती अशाप्रकारचे सीन देण्यासाठी एका पायावर तयार होत असेल अशाप्रकारचे बºयाचदा दावेही केले जातात. मात्र बºयाच कमी लोकांना माहिती आहे की, सनी बोल्ड सीन देण्याअगोदर तिच्या काही अटी आणि शर्ती ठेवत असते. होय, कुठलाही बोल्ड सीन देताना सनीची एक अट मान्य केली जाते, त्यानंतर बोल्ड सीन शूट केला जातो. ही अट म्हणजे, ती कोण्याही अभिनेत्याबरोबर बोल्ड सीन्स करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी लिओनीची पहिलीच अट ही असते की, ती कुठलाही इंटीमेट सीन अभिनेत्याबरोबर नव्हे तर पती डॅनियल वेबरबरोबर करणार. त्यामुळेच बोल्ड सीन देताना सनीचा पती डॅनियल अभिनेत्याच्या बॉडी डबलची भूमिका निभावतो. खरं सनी लिओनीची चर्चा करताना रोमान्स आणि हॉटनेसचे कॉम्बिनेशन समोर येते. परंतु बोल्डनेसमागचे वास्तव हे तिच्या पतीशी निगडीत असल्याचे म्हणता येईल. असो, सनीच्या बॉलिवूड कामाविषयी सांगायचे झाल्यास, सध्या तिचा बॉलिवूडमध्ये जबरदस्त प्रभाव दिसून येत आहे. केवळ अभिनयच नव्हे तर ग्लॅमरच्या दुनियेतही तिचा दबदबा आहे.