Join us  

 पापा सनी देओल राजकारणात बिझी, लांबला लेकाचा डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 12:23 PM

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बॉलिवूड चित्रपटाच्या रिलीजशी काय संबंध असू शकतो? तसा तर काहीही नाही. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, मोदी सरकारच्या बजट सत्रामुळे खासदार सनी देओल यांचा मुलगा करण देओल याच्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.

ठळक मुद्दे‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात करणसोबत सहर बाम्बा लीड भूमिकेत आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बॉलिवूड चित्रपटाच्या रिलीजशी काय संबंध असू शकतो? तसा तर काहीही नाही. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, मोदी सरकारच्या बजट सत्रामुळे खासदार सनी देओल यांचा मुलगा करण देओल याच्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.होय, अभिनेत सनी देओल गत वर्षभरापासून मुलगा करणला लॉन्च करण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करण बॉलिवूड डेब्यू करतोय. गेल्या हिवाळ्यात या चित्रपटाचा एक मोठा भाग शूट झाला होता. यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत या चित्रपटाचे आणखी एक मोठे शेड्यूल पूर्ण होणार होते. पण याचदरम्यान सनी देओल यांना भाजपाने गुरूदासपूर येथून निवडणूक मैदानात उतरवले. साहजिकच सनी देओल प्रचारात बिझी झालेत आणि ‘पल पल दिल के पास’चे शूटींग व पोस्ट प्रॉडक्शनचे काम ठप्प पडले. यानंतर हे मार्गी लागणार तोच सनी देओल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झालेत. 

‘पल पल दिल के पास’ हा चित्रपट सनी देओल दिग्दर्शित करत आहेत. आता दिग्दर्शकच नाही म्हटल्यावर चित्रपट पुढे कसा सरकणार. परिणामी ‘पल पल दिल के पास’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होणार होता. पण आता तो २० सप्टेंबर २०१९ ला रिलीज होईल.

‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात करणसोबत सहर बाम्बा लीड भूमिकेत आहे.  सहर हिचाही हा डेब्यू सिनेमा आहे.  मुळची हरियाणाची असलेली  सहर टाईम्स फ्रेश फेस २०१६ ची विजेती आहे व सध्या मुंबईत शिक्षण घेत आहे.

टॅग्स :सनी देओल