Join us  

सनी देओलचा मुलगा करणच्या या व्हिडीओचे होतेय कौतुक, यूजर्स म्हणाले - सुशांत की याद दिला दी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 3:40 PM

Pepole appreciate sunny deol son karan deol on social media : सनी देओलचा मुलगा करण देओलने 'पल पल दिल के पास' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

सनी देओलचा मुलगा करण देओलने 'पल पल दिल के पास' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्या 'देखो जारा' आणि 'यमला पगला दिवाना 2' या सिनेमाचे चाहते प्रतीक्षा करत आहेत. करणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये लोक करणचे खूप कौतुक करताना दिसतायेत.  

मुंबई वांद्रे येथे करण आपल्या गाडीतून बाहेर पडला तेव्हा काही मुलांनी त्याला घेरले. करणने मोठ्या प्रेमाने मुलांसोबत फोटो काढले. करणचा या व्हिडिओची चाहते कौतूक करत आहे. एका चाहत्याने लिहिले आहे, हे पाहून सुशांतची आठवण झाली. त्याचबरोबर काही चाहत्यांनी सनी देओल आणि त्यांच्या पत्नीच्या संगोपनाचेदेखील कौतुक केले आहे.

करण आता एका तेलगू सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. करणचा हा दुसरा सिनेमाही त्याचे पापा सनी देओल हेच प्रोड्यूस करणार आहेत. हा सिनेमा ‘ब्रोचेवरेवरूआ’ या तेलगू चित्रपटाचा रिमेके असेल. सनीने या सिनेमाचे हक्क विकत घेतले आहे. 

करण आपल्या फिटनेससाठीही खूप मेहनत घेत आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये तो काम करत असल्याचे दिसून येत आहे. धर्मेंद्र त्याच्यासोबत एका व्हिडिओमध्येही दिसला आहे. 

टॅग्स :करण देओलसनी देओल