Join us  

सनी देओलला झालेला आजार, सिनेमाची स्क्रिप्टही वाचता येत नव्हती, खुलासा करत म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 1:25 PM

सनी देओलसाठी २०२३ हे वर्ष लकी ठरले. त्याचा 'गदर २' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

सनी देओलसाठी २०२३ हे वर्ष लकी ठरले. त्याचा 'गदर २' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्याच्या या चित्रपटाचा 2023 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता अभिनेता त्याच्या आगामी 'सफर' चित्रपटात व्यस्त आहे. सध्या सनी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने एका आजाराचा सामना करत असल्याचा खुलासा केला. अनेक वर्षांपासून या आजाराने त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले.

एका मुलाखती दरम्यान बोलताना सनी देओलने सांगितले की, तो लहानपणापासून डिस्लेक्सिया नावाच्या आजाराने ग्रस्त होता. शाळेत असताना त्याला हा आजार झाला होता. आपल्या 40 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्याने एकदाही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली नाही. सनी देओल लहानपणापासून डिस्लेक्सिया नावाच्या आजाराशी झुंज देत आहे, त्यामुळे त्याने कधीही चित्रपटाच्या स्क्रिप्ट्स वाचल्या नाहीत. या समस्येला तोंड देण्यासाठी तो हिंदीत संवाद मागायचा आणि शब्द अनेक वेळा वाचायचा.

अभिनेत्याने सांगितले की या आजारामुळे काही लोक खूप विचित्रपण त्याच्याकडे बघायची. लोकांना वाटायचा की हा मुद्दाम करतो आहे. जेव्हा तो लोकांना आपल्या आजारावरबाबत सांगायचा तेव्हा त्याला बावळट म्हटलं जायचे. सनी देओलने याआधीही यावर भाष्य केलं आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सनी देओल शेवटचा 'गदर 2' मध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट अनिल शर्मा दिग्दर्शित होता. यात त्याच्यासोबत अमिषा पटेल दिसली होती. आता तो 'सफर' आणि 'लाहोर १९४७' मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :सनी देओल