Join us  

सनी देओलला डिम्पल कपाडियाच्या मुली मारतात या नावाने हाक, जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 7:00 PM

काही वर्षांपूर्वी सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांचा हातात हात घालून फिरत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ठळक मुद्देसनी आणि डिम्पच्या नात्यामुळे डिम्पल यांच्या मुली ट्विंकल आणि रिंकी सनी यांना छोटे पापा अशी हाक मारायला लागले. एवढेच नव्हे तर डिम्पल यांची बहीण सिम्पल यांचे 2009 मध्ये निधन झाले. बहिणीच्या निधनाने डिम्पल खचल्या होत्या, त्यावेळी सनी यांनी डिम्पलला धीर दिला.

सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी अर्जुन, मंजिल, आग का गोला, गुन्हा, नरसिम्हा यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्या दोघांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा रंगत असे. त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी प्रचंड आवडते. त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा ऐंशी-नव्वदच्या काळात चांगल्याच गाजल्या होत्या. पण त्या दोघांनी यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये त्यांचा हातात हात घालून फिरत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमकथेची चर्चा मीडियात रंगू लागली.  

डिम्पल कपाडिया यांचे राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न झाले होते. डिम्पल यांचे अतिशय लहान वयात चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. त्यांच्या बॉबी या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्यांनी त्या काळातील सगळ्यात मोठा सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले. पण लग्नानंतर काहीच वर्षांत त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि त्या दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले तर दुसरीकडे सनी देओल यांचे पूजासोबत लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले देखील होती. बॉलिवूडशादीने दिलेल्या वृत्तानुसार, राजेश खन्ना यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर डिम्पल यांच्या आयुष्यात सनी देओल आले. सनी आणि डिम्पच्या नात्यामुळे डिम्पल यांच्या मुली ट्विंकल आणि रिंकी सनी यांना छोटे पापा अशी हाक मारायला लागले. एवढेच नव्हे तर डिम्पल यांची बहीण सिम्पल यांचे 2009 मध्ये निधन झाले. बहिणीच्या निधनाने डिम्पल खचल्या होत्या, त्यावेळी सनी यांनी डिम्पलला धीर दिला. ते त्या काळात सतत डिम्पलसोबत होते. त्यांच्या कुटुंबियातील सदस्याप्रमाणेच ते सिम्पल यांच्या शोकसभेला उपस्थित होते. 

सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांना अनेक फिल्मी पार्ट्यांमध्ये एकत्र पाहायला मिळते. तसेच त्यांच्या व्हेकेशनचे फोटो देखील अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण ते दोघे नेहमीच त्यांच्या नात्याबाबत मीडियात न बोलणेच पसंत करतात. 

 

टॅग्स :डिम्पल कपाडियासनी देओल