Join us  

सनी देओल अन् डिम्पल कपाडिया पुन्हा येणार एकत्र; ‘या’ चित्रपटात झळकतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 11:36 AM

अभिनेता सनी देओल आणि डिम्पल कपाडिया या एकेकाळच्या सुपरहिट जोडीच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. होय, या फेव्हरेट जोडीचे ...

अभिनेता सनी देओल आणि डिम्पल कपाडिया या एकेकाळच्या सुपरहिट जोडीच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. होय, या फेव्हरेट जोडीचे पुन्हा एकदा पुनर्मीलन होणार आहे. एका एंटरटेन्मेंट वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल डिम्पलचा पुतण्या करण कपाडियाच्या डेब्यू चित्रपटात कॅमिओ करणार आहे. करण कपाडिया दिग्दर्शक टोनी डिझूजा यांच्या एका चित्रपटात काम करीत आहे. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, या चित्रपटात डिम्पल आणि तिचा जावई अक्षयकुमार हादेखील कॅमिओ करणार आहे. आता या यादीत सनीपाजीचेही नाव जोडले गेल्याने, ९० च्या दशकातील हे लव्हबर्ड्स पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सनी आणि डिम्पलने याअगोदर ‘नरसिंहा, अर्जुन, मंजिल-मंजिल’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ९० च्या दशकात या दोघांचे अफेअर चांगलेच चर्चेत आले होते. हे दोघे आयुष्यभर एकत्र राहतील, असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. परंतु तसे घडले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हे दोघे लंडन येथे स्पॉट झाले होते. यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ इंटरनेटवर जबरदस्त व्हायरलही झाला होता. व्हिडीओमध्ये दोघेही हातात हात धरून लंडनमधील एका बसस्टॉपवर बसले असल्याचे दिसत होते. असो, ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी ही गुड न्यूजच म्हणावी लागेल. दरम्यान, करण कपाडिया याने त्याच्या डेब्यू चित्रपटासाठी प्रचंड वजन कमी केले आहे. सुरुवातीला त्याचे वजन ११२ किलो इतके होते, आता त्याचे वजन ८८ किलो आहे. वजन कमी करण्यासाठी त्याने हॉर्स रायडिंग, बायक रायडिंग आणि स्विमिंगचे धडे घेतले. त्याचबरोबर बॅँकॉकमध्ये मार्शल आर्टची ट्रेनिंगही घेतली.