Join us  

युजरनं सुनील शेट्टीला म्हटलं ‘गुटखा किंग’, भडकलेल्या अण्णानं काय रिप्लाय दिला जरा वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:34 AM

Suniel Shetty gutka king: होय, आपल्या  ट्विटमध्ये युजरनं अजय देवगण ऐवजी चुकून सुनील शेट्टीला टॅग केलं. अण्णा मग शांत कसा बसणार? त्यानं त्या ट्रोलरला जशास तसं उत्तर दिलं.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार  (Akshay Kumar), शाहरूख खान (Shah Rukh Khan), अजय देवगण (Ajay Devgn) हे तिघेही सुपरस्टार्स सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झालेत. कारण होतं, तंबाखूची जाहिरात (Tabacco Advertisement). नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला इतकं ट्रोल केलं होतं की, त्याला माफी मागावी लागली होती. शिवाय, जाहिरातीवरही पाणी सोडावं लागलं होतं. अद्याप हे प्रकरण शांत झालेलं नसताना एका युजरनं या मुद्यावरून अण्णांची अर्थात सुनील शेट्टीची (Suniel Shetty) नाराजी ओढवून घेतली. आता ही नवी काय भानगड आहे, तर ते जाणून घेऊ यात.

तर त्याचं झालं असं की, एका युजरने रस्त्यावर लागलेल्या तंबाखूच्या जाहिरातीच्या होर्डिंगचा फोटो  ट्विट करत, यातील तिन्ही स्टार्सला टॅग करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे करताना या युजरकडून एक चूक झाली. होय, आपल्या  ट्विटमध्ये त्यानं अजय देवगण ऐवजी चुकून सुनील शेट्टीला टॅग केलं. अण्णा मग शांत कसा बसणार? त्यानं त्या ट्रोलरला जशास तसं उत्तर दिलं.

 ‘या हायवेवर पान मसाल्याच्या एवढ्या जाहिराती पाहिल्यात की आता गुटखा खाण्याची इच्छा झालीय,’ असं म्हणत एका युजरने हायवेवरील  पान मसाल्याच्या होर्डींगचा फोटो शेअर केला होता. त्यावर मोनी कृष्णन नावाच्या व्यक्तीनं प्रतिक्रिया देताना संबंधित जाहिरातीमध्ये दिसणाऱ्याअभिनेत्यांवर निशाणा साधला. ‘शाहरुख खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी तुम्ही देशाचे गुटखा किंग आहात. तुम्ही देशाला चुकीच्या दिशेने घेऊन चाललाय यासाठी तुमच्या मुलांना तुमची लाज वाटत असेल. देशाला कॅन्सरचा देश बनवू नका वेड्यांनो,’ असं लिहित त्याने त्याने संताप व्यक्त केला. या ट्विटमध्ये त्याने शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीला टॅग केलं.  गुटखा वा पान मसाल्याच्या जाहिरातींशी काहीही संबंध नसताना आपल्याला टॅग केलेलं पाहून सुनील शेट्टीनं या युजरला चांगलंच फटकारलं. शिवाय त्याची चूक त्याच्याच शब्दांत लक्षात आणून दिली.

‘भाई तू आपना चश्मा अ‍ॅडजस्ट कर ले या बदल दे,’ असा जोरदार टोला सुनील शेट्टीने या ट्विटला रिप्लाय करताना लगावला. अण्णाचा हा रिप्लाय वाचून  मोनीला आपली चूक लक्षात आली नसेल तर नवल. त्याने लगेच सुनील शेट्टीची माफी मागितली. ‘हॅलो, सुनील शेट्टी सॉरी. चुकून तुम्हाला टॅग केला. तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला अजय देवगणला टॅग करायचं होतं. पण मी तुमचा खूप मोठा चाहता आहे त्यामुळे टॅग लिस्टमध्ये तुमचं नाव सर्वात वर आहे,‘असा रिप्लाय मोनीने दिला.  

टॅग्स :सुनील शेट्टीशाहरुख खानअजय देवगणअक्षय कुमारतंबाखू बंदी