Join us  

काय मग, सोयरिक पक्की ना? के.एल. राहुलसाठीच्या ‘अण्णा’च्या पोस्टवर नेटकऱ्यांची जोरदार ‘बॅटिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 5:55 PM

राहुलनं शतक ठोकलं म्हटल्यावर चाहत्यांना आनंद झालाच. पण त्याहीपेक्षा आनंद झाला तो बॉलिवूडच्या अण्णाला...

ठळक मुद्देसुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. 

इंग्लंड दौ-यात के. एल. राहुल ( KL Rahul) जाम फॉर्ममध्ये आहे. गुरूवारी भारत- इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत त्याने शानदार शतक ठोकलं. लॉर्ड्सवरचं त्याचं हे पहिलं शतक ठरलं.  राहुलनं शतक ठोकलं म्हटल्यावर चाहत्यांना आनंद झालाच. पण त्याहीपेक्षा आनंद झाला तो बॉलिवूडच्या अण्णाला. होय, बॉलिवूडचा अभिनेता सुनील शेट्टी.सुनील शेट्टीचा (Suniel Shetty ) आनंद जणू गगणात मावेना. मग काय शुभेच्छा तर बनतातच. सुनील शेट्टीनं राहुलचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. तूर्तास याच पोस्टची चर्चा आहे. या पोस्टवर चाहत्यांनी दिलेल्या कमेंट्सची तर त्यापेक्षाही भारी चर्चा आहे.

‘क्रिकेटच्या मक्केत शतक! अभिनंदन आणि शुभआशीर्वाद बाबा... आणि माझ्या वाढदिवसाला  इतकी खास भेट दिली त्याबद्दल धन्यवाद....,’ असं सुनील शेट्टीनं  त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं.

मग काय, या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली. कारण अर्थातच अण्णाची लेक अथिया शेट्टी. सध्या अथिया व के.एल.राहुलच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहेत. इतकंच नाही, दोघंही सध्या इंग्लंडमध्येच आहेत. दोघांचे अनेक फोटो तुम्ही बघितलेच असतील. अशात अथियाच्या बाबांनी के. एल. राहुलला शुभेच्छा दिल्यावर चर्चा तर होणार.

नेटक-यांनी या पोस्टवर मजेशीर कमेंट्स दिल्या. सासरेबुवा खूश्श झालेत, असं एका युजरनं लिहिलं. सासरेबुवा याचीच वाट पाहत होता ना? असा मजेशीर प्रश्न एका युजरनं विचारला.  सोयरिक पक्की झाली समजायचं का? असा प्रश्नही एकानं विचारला.

सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. खरे तर अथिया व केएल यांपैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिली नाही. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचे काम मात्र त्यांनी न चुकता केले. दोघांचे एकत्र फोटो, एकत्र बाहेर फिरणे, एक दुस-यांचे फोटो शेअर करणे आणि त्यावर क्यूट कमेंट करणे यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या.

टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी सुनील शेट्टी