Join us

गाजावाजा न करता सुलतानचे संगीत लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 16:00 IST

सुलतान या चित्रपटाची सगळी गाणी सलमान खानने सोशल मीडियावर लाँच केली आहेत

चित्रपटांची गाणी ही चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्यावेळी रिलिज केली जातात. पण सुलतान या चित्रपटाची सगळी गाणी सलमान खानने सोशल मीडियावर लाँच केली आहेत. बेबी को बेस पसंद है हे गाणे सगळ्यात पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर काहीच मिनिटांनी चित्रपटातील सगळी गाणी सोशल मीडियावर लाँच करण्यात आली. या चित्रपटात एकूण नऊ गाणी आहेत. सुलतान चित्रपटाच्या गाण्यावरून गायक अरिजित सिंगने काहीच दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. त्याच्यानुसार सलमानमुळेच त्याने गायलेले गाणे चित्रपटातून वगळण्यात आले. या वादामुळे सुलतानची गाणी ऑनलाईन लाँच करण्यात आली असावीत अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.