Join us

आईचा ड्रेस घालून सुहाना खानने शेअर केला ग्लॅमरस फोटो, मैत्रिणीने केली ही कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 13:07 IST

सध्या सुहाना कुटुंबासोबत दुबईमध्ये आहे.

शाहरुख आणि गौरी खानची लेक सुहाना खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच सुहानाने तिचे फोटो पोस्ट केला. सुहानाचा हा फोटो बघून तिची मैत्रिण अनन्या पांड खूप इम्प्रेस झाली आहे. अनन्या सुहानाच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले, तू सगळं काही आहेस. यावर रिप्लाय देते सुहाना लिहिते, मिस यू.  सध्या सुहाना कुटुंबासोबत दुबईमध्ये आहे. ती नेहमी आयपीएलच्या मॅच बघायला  शाहरुख खान आणि भाऊ आर्यनसोबत येत असते. 

आईचा ड्रेस घालून केलं फोटोशूट सुहानाने अलीकडेच आपला फोटो शेअर केला आहे. ज्यात तीन ग्रीन कलरचा वनपीस घातला आहे. या फोटोमध्ये सुहानाने जो वनपीस घातला आहे तो तिची आई गौरी खानचा आहे. सुहानाने स्वत: ही गोष्ट सांगितली आहे. सुहाना एक मैत्रिणीने फोटोवर कमेंट करत हा ड्रेस मागितला आहे. याच उत्तर देताना सुहानाने लिहिले, हा ड्रेस माझ्या आईचा आहे.  

 सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान