Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा, शाहरुख खानच्या लेकीच्या पहिल्या सिनेमाचा टीजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 13:09 IST

शाहरूख लाईमलाईटपासून दूर आहे. पण त्याची लेक सुहाना खान मात्र चांगलीच चर्चेत आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सुहानाचे मालदीव व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान दीर्घकाळापासून पडद्यावर दिसलेला नाही. ‘झीरो’नंतर शाहरूखने एकही चित्रपट स्वीकारलेला नाही. साहजिकच शाहरूख लाईमलाईटपासून दूर आहे. पण त्याची लेक सुहाना खान मात्र चांगलीच चर्चेत आहे. कधी व्हायरल फोटोंमुळे तर कधी मित्रांसोबतच्या पार्टीमुळे सुहाना सतत चर्चेत असते. सध्या सुहाना चर्चेत आहे ती, तिच्या शॉर्ट फिल्ममुळे.होय, ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या शॉर्ट फिल्ममध्ये सुहाना मुख्य भूमिकेत आहे. याच शॉर्ट फिल्मचा टीजर रिलीज झालाय. या टीजरमध्ये सुहानाने दमदार अभिनय केला आहे.

सुहानाच्या एका फॅनपेजवरून हा टीजर शेअर करण्यात आला आहे. सुहानासोबत दिसणा-या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.  Theodore Gimeno याने या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. कॉलेजच्या ग्रूपने ही शॉर्ट फिल्म बनवली आहे. काही दिवसांपूर्वी या शॉर्ट फिल्मचे पोस्टर रिलीज झाले होते. 

सुहाना सध्या शिकतेय. गतवर्षी तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. सुहाना सध्या शिकतेय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार, असे त्याने सांगितले होते. मात्र ही शॉर्ट फिल्म बघता, अभिनेत्री बनण्यासाठी सुहाना जोमात तयारी करत असल्याचे वाटते. मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.  

कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते. आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली, असे म्हटले गेले होते.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान