Join us  

‘Ram Lakhan 2’ वर सुभाष घई यांनी सोडलं मौन; म्हणाले, "मी राम लखन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 3:32 PM

Subhash Ghai on Ram Lakhan 2: राम लखन २ येणार का?, सुभाष घई यांनी केला खुलासा.

बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई (Bollywood Director Subhash Ghai) यांनी ८० आणि ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. ८० आणि ९० च्या दशकात सुभाष घई यांना हिट मशीन मानले जात होते, ज्यामुळे मीडिया त्यांना बॉलिवूडचा दुसरा 'शोमॅन' असं संबोधू लागली होती. त्या काळात सुभाष घई त्या काळात जो चित्रपट सुरू करत तो चित्रपट हिट ठरला. सुभाष घई यांचा 'राम लखन' हा या हिट चित्रपटांपैकी एक आहे, ज्याला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. काही काळापूर्वी सुभाष घई आणखी एका प्रॉडक्शन हाऊसच्या सहकार्याने 'राम लखन 2' बनवणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

दिग्दर्शक सुभाष घई यांनी या प्रकरणी झी मीडियाशी संवाद साधला. तसंच सध्या ते 'राम लखन' किंवा त्यांच्या कोणत्याही जुन्या हिट चित्रपटाचा रिमेक करण्याच्या विचाराच नसल्याचं सांगितलं. सुभाष घई यांच्याकडे काही नवीन कथा आहेत, ज्या ते लवकरच काम सुरू करणार असल्याचं समोर आलं आहे.

"मी राम लखन २ बनवत नाहीये. आमचा बॅनर मुक्ता आर्ट्सने अनेक सुपरहिट चित्रपटांचे हक्क इतर बॅनरला दिले आहेत. कर्मा, खलनायक आणि राम लखन यांसारख्या चित्रपटांच्या हक्कांसाठी अनेक बॅनर्सनी माझ्याशी संपर्क साधला, जो आम्ही त्यांना दिला आहे. ते या चित्रपटांचं रिमेक करणार आहेत. माझ्याकडे अनेक कथा आहेत ज्यावर मला काम करायचंय. जर कोणत्याही नव्या दिग्दर्शकाला माझ्या जुन्या चित्रपटांचा रिमेक करायचा असेल तर मी त्यांचं स्वागत करतो," असंही घई म्हणाले.

टॅग्स :अनिल कपूरमाधुरी दिक्षित