Join us  

हे चित्रपट नाकारण्याचा या स्टार्सला आजही होतो पश्चाताप, ऐश्वर्याने तर नाकारले सात सुपरहिट सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 5:15 PM

तर या ब्लॉकबस्टर सिनेमांत दिसले असते वेगळेच चेहरे...

ठळक मुद्देलोकांना वेड लावणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा सिनेमा सर्वप्रथम सैफ अली खानला ऑफर झाला होता.

 या बॉलिवूड स्टार्सनी भारतीय चित्रपटांच्या इतिहास माइलस्टोन ठरणारे सिनेमे नाकारले. एकार्थाने संधी नाकारली. ही संधी नाकारल्याचा पश्चाताप आजही या स्टार्सला होतो. आज अशाच काही स्टार्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ऐश्वर्या राय

ताल, हम दिल दे चुके सनम, धूम 2, देवदास, रोबोट, गुरु सारखे दमदार चित्रपट देणा-या ऐश्वर्याने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे नाकारले. होय, राजा हिंदुस्तानीत करिश्मा कपूरचा रोल आधी ऐश्वर्याला ऑफर झाला होता. पण तिने या चित्रपटास नकार दिला. कुछ कुछ होता है यात टीनाची भूमिका आधी ऐश्वर्याला ऑफर झाली होती, पण ऐश्वर्याने त्यासही नकार दिला. याशिवाय मुन्नाभाई एमबीबीएस, वीरजारा, भूल भुलैय्या, नमस्ते लंडन, दोस्ताना, चलते चलते या सिनेमासांठीही ऐश्वर्या ही मेकर्सची पहिला पसंत होती. पण ऐश्वर्याने हे सगळे सिनेमे वेगवेगळ्या कारणांनी नाकारले आणि तिने नाकारलेले सगळे सिनेमे हिट झालेत.

 करिना कपूर

ज्या चित्रपटाने हृतिक रोशन व अमिषा पटेल यांना एका रात्रीत स्टार बनवले, तो ‘कहो ना प्यार है’ हा सिनेमा करिनाने साईनही केला होता. पण काही दिवस शूटींग केल्यानंतर अचानक तिने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि हा सिनेमा अमिषा पटेलला मिळाला. हम दिल दे चुके सनम हा ब्लॉकबस्टर सिनेमाही करिनाला मिळणार होता. पण तिने नाकारला आणि ऐश्वर्याने तो स्वीकारला. ब्लॅक या चित्रपटासाठीही करिनाला विचारणा झाली होती. एवढेच नाही तर क्वीन या सिनेमासाठीही मेकर्स करिनाला घेऊ इच्छित होते. याशिवाय, फॅशन, पेज 3, रामलीला या सिनेमातही करिना दिसणार होती. पण तिने ही संधी गमावली़ कारण तिने नाकारलेले हे सगळे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरलेत.

जूही चावला  

जुही चावला हिने राजीव मसंदला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नुकताच एक मोठा खुलासा केला होता. होय, करिश्माला जी काही प्रसिद्ध मिळाली आहे ती तिच्यामुळेच असे जुही म्हणाली होती. ते कसे तर राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है हे सुपरडुपर हिट चित्रपट जुहीला ऑफर झाले होते. परंतु जुहीने त्याला नकार दिला. तिच्या नकारानंतर मेकर्सनी या सिनेमात करिश्माला घेतले गेले. राजा हिंदुस्तानी चित्रपटामधून तर करिश्मा रातोरात स्टार बनली.

विकास भल्ला 

 १९८९ मध्ये आलेला सुरज बड़जात्या दिग्दर्शित ‘मैंने प्यार किया’ चित्रपटामध्ये सलमान खान दिसला होता.   या चित्रपटामुळे सलमान खान सुपरस्टार बनला. या चित्रपटासाठी सुरज बड़जात्याची पहिली पसंत सलमान नव्हता तर विकास भल्ला होता. पण त्यावेळी काही कारणास्तव विकासने हा चित्रपट नाकारला आणि नंतर हि भूमिका सलमानला मिळाली. सध्या विकास भल्ला टीव्ही सिरियल्समध्ये पाहायला मिळतो.

 सैफ अली खान  

लोकांना वेड लावणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा सिनेमा सर्वप्रथम सैफ अली खानला ऑफर झाला होता. पण मी लव्हर बॉय बनणार नसल्याचे कारण सांगून त्याने हा सिनेमा करण्यास नकार दिला. या चित्रपटासाठी आदित्य चोप्राने सैफला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने स्पष्ट नकार दिला. शेवटी हा चित्रपट शाहरुखला मिळाला.

अजय देवगण

१९९५ मध्ये आलेला सलमान आणि शाहरुखचा ‘करण अर्जुन’ चित्रपट खूपच सुपरहिट राहिला होता.  या चित्रपटामध्ये अर्जुनची भूमिका सर्वप्रथम अजयला ऑफर झाली होती. पण अजयने यासाठी नकार दिला त्यानंतर या भूमिकेसाठी शाहरुखची निवड करण्यात आली.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडअजय देवगणकरिना कपूर