करण जोहरच्या यश आणि रुहीच्या पहिल्या वाढदिवसाला हजेरी लावणार हे स्टार किड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:11 IST
करण जोहरच्या यश आणि रुही या मुलांचा पहिला वाढदिवस आज असून करण हा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार आहे. आपल्या ...
करण जोहरच्या यश आणि रुहीच्या पहिल्या वाढदिवसाला हजेरी लावणार हे स्टार किड
करण जोहरच्या यश आणि रुही या मुलांचा पहिला वाढदिवस आज असून करण हा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार आहे. आपल्या मुलांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये कोणतीही कमतरता पडू नये यासाठी करण स्वतः लक्ष देत आहे. या पार्टीची तयारी तो गेल्या कित्येक दिवसांपासून करत आहे. यश आणि रुहीच्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक स्टार किड हजेरी लावणार आहेत. करण जोहरने रुही आणि यशच्या वाढदिवसाच्या पार्टीला केवळ त्यांच्या वयाच्या मुलांना आमंत्रित केले आहे. याविषयी डिएनए या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले आहे की, रुही आणि यशच्या वाढदिवसाला त्याच्याच वयाची सगळी मंडळी आम्ही बोलावली आहेत. त्यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. रुही आणि यशच्या वाढदिवसाला करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर, राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांची मुलगी आदिरा, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य, शाहिद कपूरची मुलगी मिशा हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. करणने या सगळ्यांच्या पालकांना आमंत्रण दिले असल्याचे म्हटले जात आहे. करण जोहर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आहे. तो सध्या इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. करण त्याच्या कामात नेहमीच व्यग्र असतो. पण तो त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो जास्तीत जास्त वेळ रुही आणि यश सोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. करणच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी एक खास रूमदेखील त्याने बांधली आहे. ते दोघे अनेकवेळा करणच्या ऑफिसमध्ये असतात. त्यामुळे करण त्यांच्या सोबत वेळ घालवत त्याचे काम करत असतो. करण जोहर पिता झाला ही बातमी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली होती. करणने लग्न न करता पिता होण्याचा निर्णय घेतला असल्याचे लोकांना चांगलाच धक्का बसला होता. सरोगसी द्वारे रुही आणि यश यांचा जन्म झाला आहे. त्यांच्या जन्मानंतर माझे संपूर्ण आयुष्यच बदलले आहे असे करण अनेकवेळा त्याच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे. Also Read : करण जोहरला नोटीस, होऊ शकतो पाच वर्षांचा कारावास!