Join us  

‘आरआरआर’साठी आलिया भटने किती मानधन घेतले माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 8:00 AM

होय, ‘आरआरआर’साठी आलियाने घेतलेल्या मानधनाची सध्या खमंग चर्चा रंगलीये.

ठळक मुद्देतामिळ, तेलगू, हिंदी व मल्याळमसह एकूण 10 भाषांत ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडची चुलबुली गर्ल अर्थात आलिया भट (Alia Bhatt )लवकरच साऊथमध्ये डेब्यू करतेय. होय, ‘बाहुबली’फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली (SS Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमात आलिया दिसणार आहे. साहजिकच राजमौलीच्या सिनेमात आलियाचा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण बातमी ही नाही. तर खरी बातमी पुढे आहे. होय, ‘आरआरआर’साठी आलियाने घेतलेल्या मानधनाची सध्या खमंग चर्चा रंगलीये. या सिनेमासाठी आलियाने म्हणे मोठी फी वसूल केली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ‘आरआरआर’साठी आलियाला 6 कोटी रूपयांवर साईन करण्यात आले. टॉलिवूडच्या कुठल्याही अभिनेत्रीला आत्तापर्यंत इतक्या रकमेवर साईन करण्यात आलेले नाही. आलियाने आत्तापर्यंत दिलेले एकापेक्षा एक हिट सिनेमे, तिची लोकप्रियता पाहता निर्माते तिला इतकी मोठी रक्कम देण्यास तयार झाल्याचे कळते. अर्र्थात अद्याप याबाबत अधिकृत माहिती तशी नाही.

अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हासुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या बिग बजेट सिनेमावर राजमौली व निर्मात्यांनी पाण्यासारखा खर्च केला आहे. एकट्या राम चरणच्या एन्ट्री सीनवर राजमौलीने 15 कोटी रुपए खर्च केलेत. यानंतर ज्युनिअर एनटीआरच्या एन्ट्री सीनसाठी राजमौलीच्या टीमने 25 कोटींचा बजेट फायनल केल्याचे कळते. म्हणजेच दोन सीनसाठीचा हा बजेट 40 कोटींच्या घरात आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात केवळ दोन सीनवर 40 कोटी खर्च करणारा कदाचित हा पहिला चित्रपट आहे.

तामिळ, तेलगू, हिंदी व मल्याळमसह एकूण 10 भाषांत ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘बाहुबली’ सीरिजनंतर ‘आरआरआर’ हा राजमौलींचा पहिला चित्रपट आहे. बाहुबली व बाहुबली 2 या चित्रपटांनी छप्परफाड कमाई केली होती. आता ‘आरआरआर’ हा बिग बजेट सिनेमा किती कमाई करतो ते बघूच.

टॅग्स :आलिया भटएस.एस. राजमौली