Join us  

श्रीदेवीची ऑनस्क्रीन लेक अडकली लग्नबेडीत, पहा तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 1:46 PM

श्रीदेवीच्या ऑनस्क्रीन लेकीच्या ग्रॅण्ड वेडिंग सोहळ्याचे पहा फोटो

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची ऑनस्क्रीन मुलगी म्हणजेच मॉम चित्रपटातील अभिनेत्री सजल अली नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. तिने बॉयफ्रेंड अहद रजा मीरसोबत अबुधाबीमध्ये विवाह केला आहे. दोघांचा मागील वर्षी जूनमध्ये साखरपुडा केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सजल अली आणि अहद रजा मीर यांचे ग्रॅण्ड वेडिंग अमीरात पॅलेस हॉटेलमध्ये पार पडले. या सोहळ्याला जवळचे मित्र व कुटुंबातील लोकांनी हजेरी लावली होती.

सजलने लग्न सोहळ्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सजल व अहम दोघे पाकिस्तानमधील मोठे स्टार आहेत. निकाहच्या वेळी सजलने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर अहमने क्रीम कलरची शेरवानीमध्ये दिसला.

लग्नाच्या मुख्य विधींसाठी सजल आणि अहद यांनी आबू धाबीच्या जवळच्या एका आयलंडची निवड केली होती. या आयर्लंडचं नाव आहे झाया नुराइ आयलंड. हे एक प्रायव्हेट आयलंड रिसॉर्ट आहे.

सजल अली बऱ्याच कालावधीपासून अहद रजा मीरला डेट करत होती.

एगेंजमेंटच्या वेळी सजलने लिहिले होते की, आज जीवनाची नवीन सुरूवात झाली आहे. हे सांगताना आनंद होतो आहे की कुटुंबाच्या आशीर्वादासोबत आम्ही एगेंजमेंट केली.

17 जानेवारी 1994 मध्ये पंजाबच्या लाहोरमध्ये जन्मलेल्या सजल अलीनं जिओ टीव्हीचा कॉमेडी शो नादानियांमधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र ती जास्तीत जास्त पाकिस्तानी मालिकांमध्ये दिसली.

2016 मध्ये तिनं पहिल्यांदा पाकिस्तानी सिनेमा ‘जिंदगी कितनी हसीन’मधून सिनेविश्वात पदार्पण केलं. अहद व सजल यांनी बऱ्याच मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. या मालिकांमध्ये आंगन व यकीन यांचा समावेश आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती.

2017 मध्ये ती श्रीदेवींसोबत ‘मॉम’मध्ये दिसली. या चित्रपटातील सजलच्या कामाचं खूप कौतूक झालं.

या चित्रपटात श्रीदेवी व सजलसोबत अदनान सिद्दीकी, अक्षय खन्ना व नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :श्रीदेवीबॉलिवूड