श्रीदेवीने लादली जान्हवीवर बंधने!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 20:41 IST
श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे. मात्र सध्या ट्रेन्ड असलेल्या बातम्यानुसार ...
श्रीदेवीने लादली जान्हवीवर बंधने!
श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे. मात्र सध्या ट्रेन्ड असलेल्या बातम्यानुसार श्रीदेवी आपल्या मुलीच्या वागणूकीमुळे चांगलीच वैतागली असून तिने जान्हवीवर बंधने लादली असल्याचे सांगण्यात येते. जान्हवीचे करिअर सुरळीत सुुरू व्हावे यासाठी श्रीदेवीने पुढाकार घेतला असल्याचेही बोलले जात आहे. श्रीदेवीच्या दोन्ही मुली आपल्या पालकांच्या मतानुसार वागतात असे सांगितले जाते. मात्र सध्या श्रीदेवी आपल्या मुलीच्या वागण्यामुळे जरा चितेंत आहे. यामागे जान्हवीचा बॉयफ्रेण्ड शिखर पहरिया असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी व शिखर एकमेकांना किस करीत असल्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. हे फोटो श्रीदेवीच्या नाराजीचे कारण ठरले आहे. श्रीदेवीला जान्हवीची शिखरसोबत असलेली मैत्री अजिबात पसंत नाही. यासोबतच तिने आपल्या मुलीला कोणत्याच मित्रासोबत संपर्क ठेऊ नयेत असा दम दिला आहे. मीडियातील चर्चेनुसार ती जान्हवीला एकटी कुठेही जाऊ देत नाही, शिवाय मित्र-मैत्रिणीबरोबर डेटवर जाण्यास तिने प्रतिबंध घातला आहे. शिखर पहरिया आणि जान्हवी एक मेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगण्यात येते. बातम्यानुसार श्रीदेवीच्या सुुरुवातीच्या काळात तिच्या आईकडून तिला अशीच परवाणगी घ्यावी लागत होती. मात्र तेव्हाचा काळ वेगळा होता. विशेष म्हणजे ही बंधने शिखर व जान्हवीचे फ ोटो मीडियात व्हायरल झाल्यावर लावण्यात आली आहेत. यामुळे जान्हवीला आपले करिअर सुरू करताना कोणतिही अडचण जाऊ नये असे श्रीदेवीला वाटतेय. श्रीदेवीने जान्हवीला शिखरचा फोटो पाहण्यासही मनाई केली असल्याचे सांगण्यात येते. आता जान्हवी ही बंधने कुठपर्यंत पाळू शके ल हे सांगणे जरा कठीणच आहे. मात्र आई या नात्याने श्रीदेवीला आपल्या मुलीबद्दल असलेली चिंता यातून कळून येते.