Join us  

क्या बात! आता सलमान खानच्या परिवारानेही खरेदी केली क्रिकेट टीम, क्रिस गेल असणार टीमचा 'बॉस'

By अमित इंगोले | Published: October 21, 2020 1:02 PM

आता आयपीएलच्या धतरीवर श्रीलंकेतही क्रिकेट लीगची सुरूवात होणार आहे. एकूण पाच टिम्स या स्पर्धेत भाग घेणार आहेत.

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नेहमीच एक वेगळं नातं राहिलं आहे. बॉलिवूड कलाकारांनाही क्रिकेटचं आकर्षण अनेकदा बघायला मिळतं. मग ते आयपीएलमध्ये क्रिकेट टीम खरेदी करणं असो वा देशात फुटबॉलला प्रतिसाद वाढवणं असो. आता आयपीएलच्या धतरीवर श्रीलंकेतही क्रिकेट लीगची सुरूवात होणार आहे. एकूण पाच टिम्स या स्पर्धेत भाग घेणार आहेत. या लीगशी संबंधित भारतीयांसाठी आनंदाची बाब म्हणजे सलमान खानच्या परिवाराने सुद्धा एक टीम खरेदी केली आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान याने एका टीमची फ्रान्चायजी खरेदी केली आहे. त्याने कॅंडी टस्कर्स नावाची एक क्रिकेट टीम खरेदी केली आहे. असे सांगितले जात आहे की ही गुंतवणूक सोहेल खान इंटरनॅशनल एलएलपीकडून करण्यात आली आहे. याचा भाग सलमान खान आणि सलीम खानही आहेत. सोहेल खाननुसार सलमान खान सर्वच सामने बघण्यासाठी स्टेडिअममध्ये येणार आहे. तो या नव्या क्रिकेट टीमबाबत चांगलाच उत्सुक आहे.

क्रिस गेलही असणार टीमचा भाग

सलमान खानच्या टीममध्ये वेस्ट इंडीजचा दिग्गल खेळाडू क्रिस गेल यालाही जागा मिळाली आहे. तो या स्पर्धेत सिक्सर मारण्यासाठी उत्सुक आहे. तर सोहेल खान ग्रीस गेलला टीमचा महत्वाचा भाग मानतो. त्याच्यानुसार क्रिस गेल टीमचा खरा बॉस आहे. तसे कॅंडी टस्कर्स टीममध्ये इतरही अनेक चांगले खेळाडू असणार आहेत. लियाम प्लंकेट, वहाब रियाज, कुसल मेंडिस आणि नुवान प्रदीपसारखे खेळाडू या लीगमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत.

दरम्यान याआधी भारतात सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धा पार पडली होती. तेव्हा सलमान खानने यात सक्रिय भूमिका निभावली होती. या लीगमध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी आपलं क्रिकेट टॅलेंट दाखवलं होतं. अशात आता सलमानच्या परिवाराकडून श्रीलंका क्रिकेट लीगमध्ये गुंतवणूक करणं फॅन्सना आनंद देणारं ठरत आहे.  

टॅग्स :सलमान खानसोहेल खानसलीम खानश्रीलंका