Join us  

साऊथची ‘ही’ हिरोईन ठरेल का सूरज पांचोलीसाठी ‘लकी’?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 9:45 PM

ताजी खबर मानाल तर अद्यापही बॉलिवूडच्या हिरोईन्स सूरजसोबत काम करण्यास कचरत आहेत आणि याचमुळे सूरजचा तिसरा आगामी चित्रपट ‘सॅटेलाईट शंकर’साठी साऊथची हिरोईन शोधण्याची वेळ मेकर्सवर आली आहे. 

सलमान खानने लॉन्च करूनही सूरज पांचोलीला म्हणावे तसे यश लाभले नाही. अभिनेत्री जिया खान हिच्या रहस्यमयी मृत्यू प्रकरणात अडकल्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ला स्थिर करण्यात सूरजला अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. पण याहीवेळी सलमान हाच सूरजचा ‘संकटमोचक’ बनला आहे. सलमानच्याच पुण्याईने सूरजला ‘टाईम टू डान्स’ हा दुसरा चित्रपट मिळाला. केवळ इतकेच नाही तर सलमानची एक्स-गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफ हिची बहीण ईसाबेल कैफला सलमानने सूरजची हिरोईन बनवले आहे. ‘टाईम टू डान्स’चे शूटींग संपले असून सध्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. पण कदाचित इतके पुरेसे नाही, ताजी खबर मानाल तर अद्यापही बॉलिवूडच्या हिरोईन्स सूरजसोबत काम करण्यास कचरत आहेत आणि याचमुळे सूरजचा तिसरा आगामी चित्रपट ‘सॅटेलाईट शंकर’साठी साऊथची हिरोईन शोधण्याची वेळ मेकर्सवर आली आहे.

 होय, कमाल इरफान दिग्दर्शित या चित्रपटासाठी साऊथ अभिनेत्री मेघा आकाश हिला साईन केल्याचे कळतेय. त्यामुळे या चित्रपटात सूरज मेघा आकाशसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.मेघा आकाश या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड डेब्यू करतेय. मेघा आकाश हे नाव बॉलिवूडसाठी नवे असले तरी साऊथ इंडस्ट्रीत हे एक मोठे नाव आहे. रजनीकांतच्या ‘पेट्टा’ या आगामी चित्रपटात मेघा आकाश दिसणार आहे. मेघाने दिलेल्या सांगितल्यानुसार, ‘सॅटेलाईट शंकर’पूर्वी मेघा आकाशला बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आल्यात. पण त्या ‘सॅटेलाईट शंकर’ इतक्या आकर्षक नव्हत्या.मेघा म्हणतेय त्याप्रमाणे ‘सॅटेलाईट शंकर’ची आॅफर इतकी आकर्षक असेल तर चित्रपटही आकर्षक आहे, असे समजायला हरकत नाही. आता केवळ मेघा आकाश सूरजसाठी किती लकी ठरते, तेच तेवढे बघायचेय.

टॅग्स :सुरज पांचोलीसलमान खान