Join us  

साऊथचा सुपरस्टार धनुषनं केलं टक्कल, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 6:28 PM

Dhanush : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष विमानतळावर लांब दाढी आणि लांब केसांमध्ये दिसला होता. त्याचा हा लूक लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. आता पुन्हा एकदा धनुषने आपल्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) विमानतळावर लांब दाढी आणि लांब केसांमध्ये दिसला होता. त्याचा हा लूक लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. आता पुन्हा एकदा धनुषने आपल्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नुकतेच तो तिरुपती मंदिरात मुलांसोबत दिसला आणि यावेळी त्याने टक्कल केलेले पाहायला मिळाले. त्याला या लूकमध्ये लोक ओळखू शकले नाही. आता धनुषचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

धनुषचे व्हायरल होत असलेले फोटो तिरुपती मंदिरातील आहेत. धनुष आपल्या दोन मुलं यात्रा आणि लिंगासह मंदिरात पोहोचला. यावेळी त्यांच्यासोबत आई-वडील कस्तुरी राजा आणि विजयालक्ष्मीही होते. धनुषने सकाळी मंदिरात दर्शन घेतले. तिथे त्याने दाढी आणि केस कापले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या धनुषच्या फोटोंमध्ये त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा, मास्क आणि टोपी घातलेली दिसत आहे.

धनुष लवकरच दिसणार 'D50' चित्रपटात इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेले धनुषचे फोटो पाहून ते धनुषच्या आगामी चित्रपटाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, धनुष लवकरच 'D50' चित्रपटात दिसणार असून या चित्रपटासाठी धनुषने हा नवा लूक घेतला आहे. तो लवकरच 'कॅप्टन मिलर' चित्रपटातून भेटीला येणार आहे. हा चित्रपट १९३०च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यापूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण मतेश्वरन यांनी केले आहे. धनुषसोबत या चित्रपटात कन्नड अभिनेता शिवा राजकुमार आणि तमिळ स्टार सुदीप किशन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात प्रियांका अरुल मोहन मुख्य अभिनेत्री आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार असला तरी त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

टॅग्स :धनुष