Join us  

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार'चा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 8:39 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'दरबार'च्या ट्रेलरला मिळतोय चांगला प्रतिसाद

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत सध्या आपल्या आगामी चित्रपट 'दरबार'च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

'दरबार' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रजनीकांत यांचा वेगळा आणि हटके अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे. त्यांच्या लूकची तर सिनेमा इंडस्ट्रीमध्ये सध्या तुफान चर्चा सुरू आहे. या चित्रपटात ते पोलिसाची भूमिका निभावणार आहेत. रजनीकांत यांची दरवेळी प्रमाणे या चित्रपटात धमाकेदार एन्ट्री आणि सुपरकुल लूक असणार याबाबत शंकाच नाही.

या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा, प्रतीक बब्बर आणि सुनील शेट्टी एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दरबार चित्रपटाचं ए.आर. मुरुगदास दिग्दर्शन करत आहेत.  

या चित्रपटात रजनीकांत पोलिसांची भूमिका साकारत आहे. या निमित्ताने तब्बल 27 वर्षांनंतर रजनीकांत खाकी वर्दीत दिसणार आहेत. दरबार हा रजनीकांत यांचा १६९वा चित्रपट असून या चित्रपटातील रजनीकांत यांचा लूक अति लोकप्रिय झालाय. हा चित्रपट दक्षिणेकडील राज्यांमध्ये ९ जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :रजनीकांत