Join us  

अनुश्री बनली नवी इंटरनेट सेन्सेशन, हिला पाहाल तर ‘व्हायरल गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरला विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 11:29 AM

नैन मटक्का करणारी प्रिया एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनली होती. आता अनुश्री अशीच इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. 

ठळक मुद्दे‘डायमंड नेकलेस’ हा तिचा पहिला सिनेमा 2012 साली प्रदर्शित झाला. याच वर्षात रेड वाइन, लेफ्ट राइट लेफ्ट असे तिचे आणखी दोन सिनेमे रिलीज झालेत. 

इंटरनेटवर काही वर्षांआधी प्रिया वॉरिअरच्या एका व्हिडीओ क्लिपने धुमाकूळ घातला होता. नैन मटक्का करणारी प्रिया एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनली होती. आता अनुश्री अशीच इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. होय, तिच्या फोटोशूटने इंटरनेटवर धमाका केला आहे. लॉकडाऊन काळातील अनुश्रीने केलेल्या फोटोंवर लोक असे काही फिदा आहेत, की तिचे फोटो वा-याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अनुश्री आणि अनुश्री एवढीच चर्चा आहे. 

अनुश्रीचे हे फोटो नितीन नारायण यांना काढले आहेत. तिच्या या मोहक अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चा आहे. तलावाच्या निळ्याशार पाण्यात अनुश्रीने अनेक पोज दिल्या आहेत. 

पांढ-या निळ्या सलवारमधील तिच्या या फोटोंनी लोकांना नुसते वेड लावले आहे.  तिचे हे फोटोशूट केले आहे़ हे फोटो इतके मोहक आहेत की, तुम्ही नजर हटवू शकणार नाही.नेटक-यांना वेड लावणारी ही अनुश्री कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अनुश्री एक साऊथ अभिनेत्री आहे.

‘डायमंड नेकलेस’ या सिनेमातून तिने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर कमी वेळात सर्वात लोकप्रिय झाली. केरळमध्ये जन्मलेल्या अनुश्रीचे वडील साधे क्लार्क आणि आई गृहिणी़ पण अनुश्रीने करिअरसाठी अ‍ॅक्टिंगचे क्षेत्र निवडले. 

‘डायमंड नेकलेस’ हा तिचा पहिला सिनेमा 2012 साली प्रदर्शित झाला. याच वर्षात रेड वाइन, लेफ्ट राइट लेफ्ट असे तिचे आणखी दोन सिनेमे रिलीज झालेत. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाहीत. आत्तापर्यंत तिने 28 सिनेमांमध्ये काम केले आहे. अनेक टीव्ही शो तिने होस्ट केले आहेत.

टॅग्स :Tollywood