Join us  

गोरगरीबांसाठी हिरो ठरलेला सोनू सूद जगतो असे आयुष्य,पहिल्यांदाच बघा आलिशान घराचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 3:16 PM

गोरगरीबांसाठी हिरो ठरलेल्या सोनूचं नाव गेल्या काही दिवसांत गुगलवर सर्वाधिक सर्व करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यानं गुगल ट्रेडिंगच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं होतं. देशातील कानाकोपऱ्यातून त्याच्याविषयी सर्च करण्यात आलं आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचं जगणं, जीवनशैली आलिशान असते हे साऱ्यांना माहिती आहे. मात्र या गोष्टीला काही कलाकार अपवाद असतात. त्याची जीवनशैली अत्यंत सामान्य असते. मनमौजी, आपल्याच धुंदीत आणि आपल्या अटी शर्तींवर जीवन जगणारे कलाकारही या चित्रपटसृष्टीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता सोनू सद.

लॉकडाऊनच्या काळात घरी परतणाऱ्या श्रमिकांच्या पाठीशी सोनू ठामपणे उभा राहिला होता. त्यानं अशा हजारो श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी बसेसची व्यवस्था केली होती. या व्यवस्थेमुळे हजारो श्रमिकांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचणं शक्य झालं.

गोरगरीबांसाठी हिरो ठरलेल्या सोनूचं नाव गेल्या काही दिवसांत गुगलवर सर्वाधिक सर्व करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यानं गुगल ट्रेडिंगच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं होतं. देशातील कानाकोपऱ्यातून त्याच्याविषयी सर्च करण्यात आलं आहे. त्याच्याविषयी प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यात त्याच्या चाहत्यांना रस असतो.

प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. सोनू सूदचंही घर असंच आलिशान आहे. त्याच्या घराचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुंबईतील अंधेरी परिसरात सोनू सूद राहतो. जवळपास 26०० स्क्वेयर फीट इतका मोठा त्याचा फ्लॅट आहे. याच घराचे काही फोटो समोर आले आहेत.

या फोटोत सोनू निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. तो राहत असलेले घर जरी आलिशान असले तरी त्याला सामान्य आयुष्य जगणे पसंत करतो. अमाप लोकप्रियतमा मिळूनही सेलिब्रेटीचा आव न आणता त्याचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. 

घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे.घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार लिहिलेले पाहायला मिळतात. तर एका भिंतीवर ओम रेखाटलेला आहे. डायनिंगपासून गार्डन एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल.

हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल. सर्वांचा रिअल हिरो ठरत असलेल्या सोनूला मोठ्या पडद्यावर खलनायक साकारण्यासाठी मात्र बरीच मोठी रक्कम मानधन म्हणून मिळते. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनू सूदची एकूण संपत्ती 130.339 कोटी रुपये इतकी आहे.

 

टॅग्स :सोनू सूद