Join us  

सोनू सूदच्या चाहत्यांची बातच न्यारी, चिमुकल्या फॅनचा पराक्रम वाचून तुम्हीही चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 7:34 PM

देशाच्या कानाकोप-यात सोनू सूद आज त्याच्या कामामुळेच प्रसिद्ध आहे. सोनू सूदचा आज प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

करोना संकटकाळात अभिनेता सोनू सूदनं मुंबईत अडकून पडलेल्या अनेक गरिब, मजुरांना त्यांच्या घरी बनवण्याचं काम केलं होतं. करोना संकटादरम्यान सोनू सूदनं अडचणीत अडकलेल्या लोकांना अनेक पद्धतीनं मदत केली होती. सोनू सूदने कोरोना काळात लोकांची निस्वार्थ सेवा केल्यामुळे लोक त्याची देवाप्रमाणे पुजा करतात. 

देशाच्या कानाकोप-यात सोनू सूद आज त्याच्या कामामुळेच प्रसिद्ध आहे. सोनू सूदचा आज प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सोनू सूदचा चाहता वर्ग प्रत्येक वयोगटातला आहे. लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत सोनू सूद साऱ्यांचाच लाडका बनला आहे. आज अभिनेता पेक्षाही मोठा देवाचा दर्जा त्याला दिला जातो.म्हणून आवडत्या अभिनेत्याला थोडीही दुखापत झाल्याचे रिअल लाईफप्रमाणे रिल लाईफमध्येही पाहावत नाही. 

नुकताच तेलंगणामध्ये राहत असलेल्या सोनू सूदच्या एका चिमुकल्या चाहत्याने सोनूच्या प्रेमाखातच चक्क घरातलाच टीव्ही फोडल्याचे समोर आले आहे.सिनेमात एक दृष्यामुळे हा पराक्रम चिमुकल्याने केला आहे. त्याचे झाले असे की, चिमुकला घरी सोनू सूदचा 'ढुकुडु' हा सिनेमा पाहत होता. अभिनेता महेश बाबू सोनूला कानशिलात लगावतो हा सीन पाहून चिमुकल्याला इतका राग आला की त्याने राग थेट टीव्हीवर काढला.

 

 

टीव्ही फोडल्याच्या पराक्रमाची बातमी सोनूला कळाली तेव्हा त्यानेही ट्विटरवर त्या न्युज चॅनेलच्या बातमीचा व्हिडीओ शेअर करत मजेशीर कॅप्शनही दिली आहे. सोनूने लिहीले की, ‘टीव्ही फोडू नका. आता त्याचे वडील मला नवीन टीव्ही द्यायला सांगतील'.सोनू सूदचे मदत कार्य आजही सुरु आहे. कोरोना काळापासून सुरु असलेले त्याचे कार्य असेच यापुढेही अविरत सुरु राहणार त्यामुळे चाहतेही भरभरुन त्याला आशिर्वाद प्रेम देताना दिसतात. 

टॅग्स :सोनू सूद