Join us  

'मी माझं काम केलं आणि त्यांनी...'; आयकर विभागाच्या झाडाझडतीवर सोनू सूदची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 1:57 PM

Sonu sood: सध्या सोनू सूदच्या मालमत्तेची कसून चौकशी केली जात आहे. या सर्व प्रकरणात मौन बाळगलेल्या सोनूने अलिकडेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली होती.

ठळक मुद्देसोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवल्याचं म्हटलं जात आहे

कोरोना काळात अनेकांचा देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. सोनूने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवल्याचा आरोप आयकर विभागाच्या एका निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सोनू सूदच्या मालमत्तेची कसून चौकशी केली जात आहे. या सर्व प्रकरणात मौन बाळगलेल्या सोनूने अलिकडेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता अलिकडेच एका मुलाखतीत त्याने आयकर विभागाच्या झाडाझडतीत नेमकं काय झालं हे सांगितलं आहे.

"त्यांनी जी जी कागदपत्र, माहिती मागितली होती. ती सगळी आम्ही त्यांच्याकडे जमा केली आहे. त्यांनी जे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली. मी माझं काम केलं आणि त्यांनी त्यांचं. त्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले होते. त्या सगळ्यावर आम्ही कागदपत्र जमा करत उत्तर दिली. हे माझं कर्तव्य आहे आणि अजूनही मी त्यांच्याकडे कागदपत्र जमाच करत आहे. हा सगळा त्या प्रक्रियेचा भाग आहे", असं सोनू म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मी त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही कधी असं डॉक्यूमेंटेशन, डीटेल्स किंवा पेपरवर्क पाहिलं आहे का? त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे मी जे जे कागदपत्र सादर केले ते पाहून त्यांना खरंच आनंद झाला. झाडाझडती घेत असताना या चारही दिवसात त्यांना कोणताच त्रास झाला नाही."

अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू; मित्रानेही गमावले प्राण 

काय आहे आयकर विभागाचं म्हणणं?

अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरू असताना, करचुकवेगिरीचे काही पुरावे सापडले आहेत. यात अनेक बोगस घटकांकडून असुरक्षित कर्जाच्या रूपात सोनूने त्याच्या बेहिशेबी उत्पन्नाचा मार्ग काढला होता. आतापर्यंतच्या तपासात अशा २० नोंदींचा वापर केल्याचं उघड झालं आहे. तसेच संबंधित सगळ्यांनीच बोगस नोंदी दिल्याची बाब स्वीकारली आहे. तसेच कर चुकवण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकात कर्ज म्हणून व्यावसायिक पावत्या छापल्या गेल्या असून त्याचा वापर गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता घेण्यासाठी केला गेला आहे. आतापर्यंत एकूण २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर अशा पद्धतीने चुकवला आहे. 

टॅग्स :सोनू सूदसेलिब्रिटीइन्कम टॅक्स