Join us  

सोनू सूद आम आदमी पार्टीत जाणार?; अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:54 AM

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता सोनू सूद अभिनय सोडून राजकारणात प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या भेटीनंतर केजरीवाल यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी मेंटर कार्यक्रमाचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून सोनू सूदची निवड करण्यात आली. 'सोनू सूद सर्वांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असतो देशासाठी तो एक प्रेरणास्थानी आहे', असे अरविंद केजरीवाल यांनी यावेळी म्हटले.

पत्रकार परिषदेत जेव्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारण्यात आले की सोनू सूदसोबत राजकीय चर्चादेखील झाली का?, त्यावर केजरीवाल म्हणाले की, नाही-नाही आमच्यात कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. तर सोनू सूद म्हणाला की, काहीच राजकीय नाही. मुलांच्या भविष्याचा प्रश्न हा राजकारणापेक्षा मोठा प्रश्न आहे. मला बऱ्याच काळापासून राजकारणाशी जोडण्याची संधी मिळत आली आहे, पण मी इंटरेस्टेड नाही. माझा असा कोणताच विचार नाही. ज्याचे विचार चांगले आहेत त्यांना दिशा नक्कीच मिळते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहित देत सांगितले की, सोनू सूद देशाचा मेंटॉर कार्यक्रमाचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनण्यासाठी सहमत झाला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सरकारी शाळेच्या मुलांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. जे सप्टेंबरच्या मध्यात लाँच केले जाणार आहे.

सोनू सूद म्हणाला की, मुख्यमंत्री साहेबांनी नवीन जबाबदारी दिली आहे, चांगल्याने निभावण्याचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा शाळा आणि शिक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वात आधी दिल्लीचे नाव पहिले समोर येते. देशाचा मेंटॉर कार्यक्रमात चांगले परिणाम समोर येतील. मुलांना त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्यात मदत होईल.

टॅग्स :सोनू सूदअरविंद केजरीवालआम आदमी पार्टीदिल्ली