Join us  

तुम्ही त्याच लायकीचे आहात...! सोनू निगमने संतापून ट्रोलर्सला हासडल्या शिव्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 1:51 PM

ट्रोलिंगमुळे सोनू प्रचंड संतापला. इतका की, ट्रोलर्सला नको ते बोलला...! रक्तदान करताना सोनूने तोंडावर मास्क लावला नव्हता. त्यामुळे नेटक-यांनी त्याला जबरदस्त ट्रोल केले होते

ठळक मुद्देसोनू निगम अलीकडे रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यासाठी गेला होता. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर त्याने स्वत: पुढाकार घेत रक्तदानही केले होते.

बॉलिवूड सिंगर सोनू निगम या ना त्या कारणाने चर्चेत असतोच. काहीच दिवसांपूर्वी सोनू निगम (Sonu Nigam ) रक्तदान करताना दिसला होता. रक्तदान करतानाचा फोटो शेअर करत, त्याने याची माहिती दिली होती. मात्र सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्याचा हा प्रयत्न त्याच्यावरच उलटला होता. कौतुक करण्याऐवजी हा फोटो पाहून लोकांनी त्याला ट्रोल केले होते. कारण काय तर मास्क. रक्तदान करताना सोनूने तोंडावर मास्क लावला नव्हता. त्यामुळे नेटक-यांनी त्याला जबरदस्त ट्रोल केले होते. पण या ट्रोलिंगमुळे सोनू प्रचंड संतापला. इतका की, ट्रोलर्सला सुनावताना नको ते बोलला. (Sonu Nigam abuses who trolls him for not wearing mask when he donating blood)

ट्रोलर्सला फैलावर घेत त्याने एक ट्विट केले. ‘इथे (सोशल मीडियावर) आइंस्टाइन बनून फिरणा-यांनो, मला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ द्या. कारण तुम्ही त्याच लायकीचे आहात. साले गधों, उल्लू के पट्ठों... रक्तदान करताना मास्क लावण्यावी परवानगी नसते. आणखी किती खालच्या दर्जाला जाणार आहात साले लेफ्टिस्ट?’, असे सोनूने लिहिले.

सोनू निगम अलीकडे मुंबईतल्या जुहू इथे आदर्श फाऊंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यासाठी गेला होता. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर त्याने स्वत: पुढाकार घेत रक्तदानही केले होते. शिवाय करोना लस घेण्याअगोदर रक्तदान ही करा, असे आवाहन देखील त्याने केले होते. पण कुणीतरी याला मास्क दान करा, असे म्हणत लोकांनी त्याला ट्रोल केले होते.सोनूला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. अनेक दिवसांनंतर त्याने याबद्दलचा खुलासा केला होता. आता तो यातून बरा झाला आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतोय.

टॅग्स :सोनू निगम