Join us

कार अपघात मॉडेल सोनिका चौहानचा मृत्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 21:38 IST

मॉडेल आणि अभिनेत्री सोनिका चौहान हिचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी झाली असून, सोनिकाच्या ...

मॉडेल आणि अभिनेत्री सोनिका चौहान हिचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी झाली असून, सोनिकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनाली बंगाली टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा विक्रम चॅटर्जी यांच्यासोबत होती. तेव्हाच ही घटना घडली. हा कार अपघात कोलकाता येथील रासबिहारी एवेन्यूजवळ पहाटे ४.३० ते ५ वाजेच्या दरम्यान झाला. हा अपघात एवढा भयानक होता की, सोनिका आणि तिचा मित्र विक्रम चॅटर्जी गंभीररीत्या जखमी झाले होते. जेव्हा जखमी अवस्थेत या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा सोनिकाला मृत घोषित करण्यात आले, तर विक्रम यांच्या डोक्याला मार लागलेला असल्याने त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे. }}}} विक्रम चॅटर्जी स्वत:च त्याची पांढºया रंगाची टोयोटा कोरोला आॅल्टिस कार चालवित होते. रासबिहारी एवेन्यूजवळ येताच त्यांचे अचानक कारवरील नियंत्रण सुटले अन् कारची डिव्हाडरला जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भयानक होती की, यामध्ये सोनिका आणि विक्रम गंभीर जखमी झाले. घटनेनंतर लगेचच त्यांना जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी लगेचच सोनिकाला मृत घोषित केले. तर विक्रम याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. असे म्हटले जात आहे की, विक्रम खूपच जोरात कार चालवित होता. अपघातानंतर कारचे एयरबॅग व्यवस्थितरीत्या उघडले नसल्याने दोघे गंभीररीत्या जखमी झाले. दरम्यान, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण शोधत आहेत. त्याकरिता घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे सध्या काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी विक्रमची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत, तर मॉडेलिंग आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या सोनिकाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनिका पश्चिम बंगालमधील प्रमुख मॉडेलपैकी एक होती. तिचे वय केवळ २८ होते. तिने अनेक फॅशन शो आणि बºयाचशा जाहिरातीत काम केले आहे. प्रो-कबड्डी लीगमध्ये तिने सूत्रसंचालन केले होते. शिवाय ती मिस इंडिया फायनलिस्ट होती. विक्रमदेखील एक टीव्ही अभिनेता होता.